सिनेमा हेच माझे फर्स्ट लव्ह – रसिका दुग्गल

“सिनेमा हेच माझे फर्स्ट लव्ह आहे, पण मी माध्यमाला महत्त्व देतच नाही. कारण माझ्यासाठी सिनेमाचा कंटेंट जास्त महत्त्वाचा आहे.’ असे अभिनेत्री रसिका दुग्गलने म्हटले आहे. रसिकाने 2007 मध्ये “अनवर’मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर “मंटो’सह अन्य काही सिनेमांमध्येही रसिकाने काम केले. त्यामध्ये “पावडर’, “पीओडब्लू – बंदी युद्ध के’ आणि “किस्मत’ या सिरीयलमध्येही तिला चांगला रोल मिळाला होता. मात्र तिची “मंटो’तील भूमिका जास्त लक्षात ठेवली गेली आहे.

छोट्या पडद्यावर जी मिळेल ती भूमिका तिने स्वीकारली. हे रोल खूप छोटे होते. हे रोल खूप लांबीच्या सिरीयल अथवा “फुल टाईम’ नव्हते. त्यामुळेच तिचे कामही लक्षात न येण्यासारखे होते. टीव्हीवर आणखी काही काळ काम केले असते तर कदाचित “फुल टाईम’रोल मिळाले असते. करिअरच्या अन्य माध्यमांबाबत बोलायचे तर “दिल्ली पोलीस’ नावाच्या एका वेब सिरीजमध्येही रसिकाने काम केले आहे. त्यामध्ये तिने चक्क पोलीस इन्स्पेक्‍टरचा रोल साकारला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय एजाज खान दिग्दर्शित “हमिद’मध्येही ती दिसणार आहे. ही एका अशा स्त्रीची कथा आहे, जिचा नवरा एके दिवशी अचानक गायब होतो आणि तिच्या मुलाच्या डोक्‍यावरून पित्याचे छत्र हरपते. वडील अल्लाकडे गेले असे त्याला सांगितले जाते, तर 786 हा अल्लाचा क्रमांक असल्याचे त्याला आईकडून समजते. त्यानंतर त्या मुलाच्या मनातील कुतुहल दाखवणारी ही कथा आहे.

पण सिनेमा हेच रसिकाचे “फर्स्ट लव्ह’ होते. याच काळात रसिका थिएटरपण करत होती. मात्र, माध्यम हा तिच्यासाठी महत्त्वाचा मुद्दाच नव्हता. फक्‍त कंटेंट महत्त्वाचा मानत असल्याने तिने मोठ्या पडद्यावरच्या कामाकडे अधिक लक्ष दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)