सिनेमाचे सबटायटल आता सेन्सॉरच्या कात्रीत

निर्मात्यांची हायकोर्टात धाव
मुंबई – चित्रपटासह सिनेमाच्या सबटायटल ही सेन्सॉर बोर्डाकडे पाठविण्याच्या केंद्रीय चित्रपट परिक्षण बोर्डाच्या निर्णयामुळे चित्रपटासह सिनेमाचे सबटायटलही सेन्सॉरच्या कचाट्यात अडकण्याची शक्‍यता आहे. या विरोधात इंडियन मोशन पिक्‍चर प्रोड्युसर्स असोसिएशन (आयएमपीपीए)ने हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायमूर्ती आर एम बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने दखल घेऊन सेन्सॉर बोर्डाला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

सेन्सॉर बोर्डाने नवीन नियमावली तयार करून चित्रपटाच्या सबटायटलसाठी सेन्सॉरचे प्रमाणपत्र बंधन करण्यात आले. तशी नोटीसीही काढली. चित्रपटाचे सबटायटल सेन्सॉरकडे पाठवणे म्हणजे अडवणूक करण्याचा प्रकार आहे, असा आरोप याचिकेत केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या नवीन नियमामुळे निर्मात्यांनी आधी चित्रपटासाठी प्रमाणपत्र घेतल्यानंतर सबटायटलचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याकरीताही नव्याने प्रमाणपत्र घ्यावे लागेल. सेन्सॉर बोर्डाच्या या नवीन अटी जाचक असून केवळ निर्मात्यांकडून पैसा उकळण्यासाठीच हा नियम केला आहे. असा आरोप करताना या सर्व प्रकियेमुळे चित्रपटाचे प्रदर्शनही लांबणीवर पडण्याची भिती व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)