“सिद्धेश लाड नेहमीच विद्यार्थ्याच्या भूमिकेत’

भारत अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे प्रशंसोद्‌गार 
मुंबई – सिद्धेश लाड हा केवळ उत्कृष्ट खेळाडू नसून तो एक चांगला विद्यार्थी आहे. प्रशिक्षकांकडून तंत्र शिकण्याबाबत तो नेहमीच उत्सुक असतो. यामुळे त्याच्या कामगिरीत दिवसेंदिवस सुधारणा होताना दिसून येत आहे, असे प्रशंसोद्‌गार भारत अ संघाचे मुख्य पशिक्षक राहुल द्रविड यांनी काढले आहेत. दक्षिण आफ्रिका अ आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झालेल्या सिद्धेश लाडबद्दल बोलताना राहुल द्रविड यांनी कोणतीही काटकसर केली नाही.

सिद्धेश लाड हा रोहितच शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचा पुत्र असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सिद्धेशने शालेय स्तरापासून क्रिकेट क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. विविध स्तरांवर चमक दाखवल्यानंतर सिद्धेशला 2013 मोसमात पंजाबविरुद्ध रणजी पदार्पण करण्याची संधी मिळाली. गेल्या काही वर्षांत सिद्धेश लाडने मुंबईसाठी निर्णायक कामगिरी बजावली. त्याने या मोसमात मुंबईकडून सर्वाधिक 652 धावाही केल्या. गेल्या हंगामात त्याच्या संयमी व चिवट खेळीने संघाला बाद फेरीत पोहोचवले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी ज्या-ज्या संघांकडून खेळलो त्यांच्यासाठी नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असतो. बीसीसीआयच्या अध्यक्षीय एकादश संघात वर्णी लागल्याने मी अत्यंत आनंदी आहे. त्यामुळे माझा प्रयत्न निश्‍चितच चांगली कामगिरी करण्याचा असणार आहे, असे सिद्धेश लाडने पत्रकारांशी बोलताना सांगितले. बेळगाव येथे 30 जुलैला होणाऱ्या सामन्यात ईशान किशन भारत अ संघाची धुरा सांभाळणार आहे. सिद्धेशला स्थान मिळल्यास त्याला आपली चुणुक दाखवण्याची संधी मिळेल. गेल्या आयपीएल हंगामात सिद्धेश लाडचा मुंबई इंडियन्स संघात समावेश होता; पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आगामी एकदिवसीय चतुरंगी मालिका ही सिद्धेशला चांगली कामगिरी करत भारतीय संघाचे दरवाजे ठोठावण्याची चांगली संधी आहे. सध्या मुंबईच्या रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर यांचा भारतीय संघात समावेश आहेत. आता सिद्धेशलादेखील आपल्या कामगिरीच्या जोरावर निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याची संधी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)