सिध्दटेक : सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पहाटेपासूनच गर्दी

देऊळगावराजे- सिध्दटेक (ता. कर्जत)येथे अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे चार वाजल्यापासूनच सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी दौंड,कर्जत, श्रीगोंदा, तालुक्‍यातुन कोणी चालत, तर कोणी वाहनांमधून आले होते. मंदिर पहाटे चार वाजता उघडण्यात आले, त्यानंर श्रींच्या मूर्तीला स्नान घालून अभिषेक करण्यात आला आणि मंदिराचे प्रवेशद्वार दर्शनासाठी खुले करण्यात आले.

दुपारी बारा वाजता श्रींना नैवद्य दाखवण्यात आला, त्यानंतर चिंचवड देवस्थानकडून आलेल्या भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात आला. यावेळी भाविकांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय करण्यात आली होती, तसेच वाहनांची पार्किंग व्यवस्थाही चांगल्या पद्धतीने करण्यात आली होती. यावेळी कर्जत पोलिसंनी मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)