सिद्धरामय्यांपेक्षा कुमारस्वामी आठ पट अधिक श्रीमंत

बंगळूर – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे कुटूंबीय 20 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटूंबीयांपेक्षा जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एच.डी.कुमारस्वामी आठ पटीने अधिक श्रीमंत आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सिद्धरामय्या आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी कुमारस्वामी यांनी त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये आपापली मालमत्ता जाहीर केली. त्यानुसार सिद्धरामय्या यांच्याकडे 11 कोटींची तर त्यांच्या पत्नी पार्वती यांच्याकडे 7 कोटी रूपयांहून अधिक मालमत्ता आहे.

हिंदू अविभक्त कुटूंब म्हणून या दाम्पत्याकडे दीड कोटी रूपयांहून अधिक मालमत्ता आहे. माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे पुत्र असणाऱ्या कुमारस्वामी यांच्याकडे सिद्धरामय्या यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मालमत्ता आहे. त्यांच्या आणि पत्नीच्या नावांवर तब्बल 167 कोटी रूपयांची मालमत्ता आहे. कुमारस्वामी यांच्या नावे 42 कोटींहून अधिक तर त्यांच्या पत्नीच्या नावे 124 कोटी रूपयांहून अधिक मालमत्ता आहे. कुमारस्वामी यांनी त्यांच्या पत्नीचा उल्लेख उद्योजिका म्हणून केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)