सिंहगड घाट रस्ता लवकरच खुला होणार

पुणे,दि.29 – पुणे शहर आणि परिसरातील पर्यटकांचे प्रमूख आर्कषण असणाऱ्या सिंहगडाचा घाट रस्ता येत्या आठवड्यात सुरु होणार असल्याचे वन खात्याच्यावतीने सांगण्यात आले आहे. दरड कोसळल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता.
जून महिन्यात झालेल्या पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यामुळे हा घाट रस्ता बंद करण्यात आला होता. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नव्हती.या अपघातानंतर दरड हटविण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले होते.
सिंहगड हे पुणे शहर परिसरातील पर्यटकांचे प्रमुख आर्कषण केंद्र आहे. पावसाळ्यात तर या गडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. विशेषत; शनिवार आणि रविवारी तर त्यात दुप्पटीने वाढ होते. हा घाट रस्ता बंद असल्याने वाहन चालकांना वाहने गडाच्या पायथ्याशी लावून मग चालत वर जावे लागत आहे.
आता हा घाट रस्ता पुर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. त्याचबरोबर दरड कोसळल्यानंतर या रस्त्यावर पडलेले खड्डे सुद्धा बुजविण्यात आले आहेत. याशिवाय ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. त्याठिकाणी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात हा घाट रस्ता पुन्हा वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक महेश भावसार यांनी सांगितले.

खडकवासला चौपटी आता रविवारी बंद
सिंहगडाचा घाट रस्ता खुला होत असताना दुसरीकडे खडकवासला येथील चौपटी रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे. खडकवासला चौपाटीचा रस्ता हा अरुंद असल्याने या रस्त्यावर रविवारी मोठी गर्दी होते.या गर्दीमुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.सिंहगडावर जाणारे पर्यटक खडकवासला चौपाटीवर थांबतात त्यामुळे कोंडी होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी आता रविवारी चौपाटी बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)