सिंबायोसिस कला व वाणिज्य महाविद्यालयाला विजेतेपद

आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धा

पुणे: पुणे जिल्हा परिषद व पुणे महानगरपालिका यांनी आयोजित केलेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत सिंबायोसिस कला व वाणिज्य महाविद्यालय संघाने विजेतेपदाचा मान मिळविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंबायोसिस महाविद्यालय संघाने अंतिम लढतीत सर परशुराम भाऊ महाविद्यालय संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करीत विजेतेपदाची निश्‍चिती केली. अंतिम फेरीत सिंबायोसिसच्या अर्णव दत्ताने स. प.च्या अनुरागचा 11-2, 11-9 असा पराभव केला. तर आर्यन पानसेने नीलवर 11-3, 11-7 अशी मात केली. साहिल सलुजाने अनिकेतचा 11-6, 11-9 असा पराभव करीत सिंबायोसिसच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

त्याआधी उपान्त्य लढतीत सिंबायोसिसने बिशप्स कनिष्ठ महाविद्यालय संघाचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या सामन्यात आर्यन पानसेने जनमेजयचा 11-8, 11-2 असा पराभव केल्यावर वरुण देशपांडेला सिद्धार्थकडून 10-12, 5-11 असा पराभव पत्करावा लागला. परंतु अर्णव दत्ता व आर्यन पानसे यांनी अनुक्रमे अनुप व सिद्धार्थ यांच्यावर मात करून सिंबायोसिसला अंतिम फेरीत नेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)