सिंधू पाणी करार : भारत-पाकिस्तानमध्ये लवकरच महत्वपूर्ण बैठक 

नवी दिल्ली – सिंधू नदी पाणी वाटप प्रकरणावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये लवकरच बैठक होणार आहे. पाकिस्तानच्या इमरान सरकारसोबत होणारी ही भारताची पहिलीच बैठक असणार आहे. या बैठकीत स्थायी सिंधू आयोगही सहभागी होणार असून सिंधू नदी पाणी वाटप करारच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

सिंधू पाणी वाटपाबाबत २९ व ३० ऑगस्टला लाहोरमध्ये ही बैठक संपन्न होईल. या बैठकीत भारताचे नेतृत्व पी.के. सक्सेना तर पाकिस्तानचे सैय्यद मेहर अली शाह करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकचे पंतप्रधान इमरान खान यांना शुभेच्छा पत्र लिहिताना पाकिस्तानसोबत अर्थपूर्ण व विधायक चर्चा होणे गरजेचे असल्याचे म्हंटले होते. शिवाय पाकिस्तान जोपर्यंत आतंकवादी संघटनांवर नियंत्रण आणत नाही, तोपर्यंत कुठलीही चर्चा शक्य नसल्याचे भारताने याआधीच स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय असतील बैठकीचे मुद्दे –
पर्मनंट इंडस कमिशन (पीआईसी)म्हणजेच स्थायी सिंधू आयोगामध्ये दोन्ही देशांचे अधिकारी सहभागी होत असतात. ही बैठक प्रत्येक वर्षातून एकदा होत असते. परंतु या वर्षातील ही बैठक दुसरी असणार आहे. याआधीही मार्चमध्ये एक बैठक झाली होती. पाकिस्तानकडून चिनाब नदीवर बनविण्यात येणारा ८५० मेगावॅटचा हायड्रोलेक्ट्रिक प्रोजेक्ट, १००० मेगावॅट पकल दुल प्रोजेक्ट सिंधू नदी पाणी वाटपाच्या कराराचे उल्लंघन असल्याचे सांगितले जात आहे. हाच मुद्दा या बैठकीत मध्यवर्ती असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)