सिंधूला ऐतिहासिक रौप्यपदक 

अंतिम फेरीत ताय त्झु यिंगविरुद्ध सरळ गेममध्ये पराभव 
जकार्ता- अनपेक्षितरीत्या एकतर्फी ठरलेल्या अंतिम लढतीत चायनीज तैपेईच्या ताय त्झु यिंगविरुद्ध सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताची अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधूला आशियाई क्रीडास्पर्धेतील महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र पराभवानंतरही सिंधूने तिने ऐतिहासिक कामगिरी केली असून आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

सिंधूला याआधी जागतिक स्पर्धेत दोन वेळा, तसेच रिओ ऑलिम्पिकमध्ये एकदा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. ताय त्झु यिंगकडून झालेल्या पराभवामुळे अंतिम फेरीत दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरण्याचे सिंधूचे सत्र आशियाई स्पर्धेतही कायम राहिले. ताय त्झु यिंगने 21-13, 21-16 अशा फरकाने विजय मिळवून सुवर्णपदकाही कमाई केली. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये यिंगवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, मात्र या कामगिरीची पुनरावृत्ती करणे तिला जमले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंधू आणि यिंग यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच यिंगचं पारडे जड दिसत होते. आतापर्यंत यिंगने सिंधूला 10 वेळा पराभूत केले असून सायना व सिंधू यांनी यिंगविरुद्ध एकूण 21 वेळा पराभव पत्करला आहे. अर्थात सिंधूने कमावलेले रौप्यआशियाई स्पर्धेतील बॅडमिंटनमधील भारताचे पहिलेच रौप्यपदक आहे. यापूर्वी 1982 मध्ये सय्यद मोदीने तर यंदा सायना नेहवालने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. त्यामुळे सिंधूची कामगिरी ऐतिहासिक ठरली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी सिंधू पहिली भारतीय महिला ठरली होती. मात्र सुवर्णाने तिला हुलकावणी दिली.

चायनीज तैपेईच्या यिंगने सुरुवातच आक्रमणाने केली. तिने दमदार स्मॅश आणि नेट प्लेसिंगचा सुरेख खेळ करताना अवघ्या 16 मिनिटांत पहिली गेम 21-13 अशी जिंकली. या गेममध्ये सिंधूने पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले, परंतु तिला नशिबाची साथ लाभली नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ताय त्झु यिंगने 11-7 अशी आघाडी घेतली होती. त्यात सातत्याने गुणांची भर घालताना तिने ही गेम घेत आघाडी मिळविली.

दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने यिंगला झुंज देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या सेटच्या मध्यंतरापर्यंत सिंधूने सामन्यात पुनरागमन करत काही मॅचपॉईंट वाचवले. मात्र यिंगने आपला सर्व अनुभव पणाला लावत 21-16 च्या फरकाने दुसरा सेट जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. चायनीज तैपेईचेही आशियाई क्रीडास्पर्धेतील हे पहिलेच सुवर्ण ठरले. दोन तिरंदाजी संघांनंतर आजच्या दिवसातलं भारताचे हे तिसरे रौप्यपदक ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)