सिंडिकेट बॅंकेला विशेष कृषी वित्त शाखा म्हणून दर्जा

पवनानगर – तळेगाव दाभाडे येथील सिंडिकेट बॅंकेला विशेष कृषी वित्त शाखा म्हणून दर्जा प्राप्त झाले आहे.
तळेगाव येथील सिंडिकेट बॅंकेला विशेष कृषी वित्त शाखेचा दर्जा प्राप्त झाला असून, या नवीन शाखेचे उद्‌घाटन नुकतेच संपन्न झाले. या शाखेचे उद्‌घाटन बॅंकेचे कार्यकारी संचालक एस. कृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बॅंकेचे ग्रामीण विभागाचे महाप्रबंधक सी. बी. एल. नरसिंहराव, टी. मनीवष्णन, उपमहाप्रबंधक आर. कृष्णण, पंडित शिकारे, ज्ञानेश्‍वर शेळके, पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकूंद ठाकर, ज्ञानेश्‍वर ठाकर, चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्‍वर आडकर, शाखाधिकारी जे. के सिंग यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
या वेळी बोलताना एस. कृष्णन म्हणाले की, शाखेला विशेष दर्जा प्राप्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणाला होणाऱ्या विलंब कमी होईल. बॅंक शेतकऱ्यांच्या वृद्धिसाठी कार्यरत राहिल तसेच सुधारित तंत्रज्ञानावरील शेतीसाठी लागणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीसाठी कर्जपुरवठा केला जाईल.

या वेळी बॅंकेने दहा दिवसांत 18 कोटी रूपये वाटप केले. बॅंकेचे शाखाधिकारी जे. के. सिंग यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्जप्रकरण मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले. बॅंकेचे शाखाधिकारी जे. के. सिंग यांनी प्रास्ताविक केले. आर. कृष्णन यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)