सिंगापूरमधील १६४ वर्षे जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा रंगला

सिंगापूर : लिटल इंडिया नावाच्या परिसरात असलेल्या श्री श्रीनिवास पेरुमल या १६४ वर्षे जुन्या मंदिराचा देखणा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

विशेष म्हणजे या धार्मिक कार्यक्रमासाठी सिंगापूरचे पंतप्रधान ली सनी लूंग, चार मंत्री आणि सुमारे ४० हजार भाविक उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त देवाच्या मूर्तीला महा सम्प्रक्षाणम् हा अभिषेक घालण्यात आला. यासाठी ३४५ लाख सिंगापूर डॉलर्सचा खर्च करण्यात आला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून हे जीर्णोद्धार काम सुरू होते. हे मंदिर म्हणजे सिंगापूरमधील सांस्कृतिक विविधता आणि शांततेचे एक प्रतीक आहे. दर १२ वर्षांनी या मंदिराची दुरुस्ती केली जाते. यात नागरिकदेखील सहभाग नोंदवतात. दरम्यान, या सोहळ्याबद्दल सिंगापूरच्या पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)