सा रे ग म पा कार्यक्रमात वाजिद खान पुन्हा परीक्षक

गतवर्षीच्या ‘सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाच्या प्रचंड यशानंतर ‘झी टीव्ही’वर सर्वाधिक काळ चाललेल्या गाण्याच्या क्षेत्रातील गुणवान होतकरू गायकांचा शोध घेणारा सा रे ग म पा हा कार्यक्रम पुन्हा परतणार आहे. त्यामुळे आपल्या आवाजाला जगापुढे सादर करण्याची आणि संगीताच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याची आणखी एक संधी होतकरू गायकांसाठी उपलब्ध झाली आहे.

आज पार्श्वगायनाच्या क्षेत्रात नामवंत बनलेल्या श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला, कमाल खान, अमानत अली, राजा हसन, संजीवनी आणि बेला शेंडे हे आणि यासारखे काही गायक-गायिका या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच जगापुढे आले होते. आता अशी चर्चा सुरू आहे की नामवंत गायक आणि संगीतकार वाजिद खान हा या कार्यक्रमात परीक्षक या नात्याने काम बघणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाजिद खान हा सा रे ग म पा या कार्यक्रमाशी पूर्वीपासून निगडित असून त्याने पूर्वीही या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहिले होते. वाजिदचे अनेक अल्बम यांनी विक्रमी विक्री केली असून एक संगीतकार, गायक म्हणून दबंग-2, एक था टायगर, जुडवा-2 आणि इतर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्याने यशस्वी योगदान दिले आहे. सा रे ग म पा कार्यक्रमाच्या 2016 मधील आवृत्तीत परीक्षक म्हणून काम केलेला वाजिद आता यंदा पुन्हा एकदा परीक्षक म्हणून या कार्यक्रमात परतणार आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांना आपले गायन सुधारण्यासाठी तो त्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहे. या स्पर्धकांचे गायन अधिक सपाईदार करून त्यांना त्यात सुधारणा करण्यासाठी तो त्यांना आपला अनुभवाचा सल्ला देईल.

‘सा रे ग म पा’ कार्यक्रमाशी असलेल्या आपल्या संबंधांबद्दल वाजिद खान म्हणाला, “सा रे ग म पा कार्यक्रमाच्या आगामी भागात मला सहभागी होता येणार आहे, या कल्पनेनेच मी खुश झालो आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या गाण्याचे परीक्षण करण्याशी माझा जुना संबंध आहे. मी यापूर्वी तीनवेळा साजिदबरोबर या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम केलं आहे. आगामी आवृत्तीत मात्र मी एकटा असेन. मला साजिदची आठवण येऊन चुकल्यासारखं नक्कीच वाटेल. या कार्यक्रमातील स्पर्धकांची गुणवत्ता फारच उच्च आहे, कारण या कार्यक्रमाची टीम देशभरातील फक्त उत्कृष्ट होतकरू गायकांचीच स्पर्धक म्हणून निवड करतात. आपल्या अंगच्या गायन कलेचा आविष्कार करण्यासाठी होतकरू गायकांना हा कार्यक्रम म्हणजे एक मोठे व्यासपीठ लाभलं आहे. आजच्या पिढीतील वैविध्यपूर्ण आवाज पुन्हा ऐकण्यास मी उत्सुक बनलो आहे. संगीताच्या क्षेत्रात दरवर्षी बदल होत असून कार्यक्रमातील स्पर्धकांनी आपल्या गायन कलेचं कौशल्य अधिक सफाईदार करण्यासाठी जास्तीची मेहनत करण्याची गरज आहे. यंदा या कार्यक्रमात परीक्षक मंडळात माझ्या जोडीला शेखर रावजियानी आणि सोना मोहपात्रा हे दोन जणही असतील. मला त्यांच्याकडूनही बरंच काही शिकता येईल. सा रे ग म पा  हा कार्यक्रम म्हणजे भारतीय संगीताच्या क्षेत्राचे आजोळ आहे. यंदा यातील गायनकलेचा स्तर आम्ही अधिक उंचावणार आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)