सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दहावे स्थान

गतवर्षी नववे स्थान, यंदा एक क्रमांकाने घसरण
प्रभात वृत्तसेवा
पुणे – देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी (राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन) आज जाहीर करण्यात आली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात दहावे स्थान पटकावले आहे. यावर्षी पुणे विद्यापीठ गतवर्षीच्या तुलनेत एक क्रमांकाने पिछाडीवर आले आहे. पहिल्या दहा विद्यापीठांत स्थान मिळविणारे पुणे हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ यावर्षी ठरले आहे. बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने यंदाही देशात पहिले स्थान यंदाही कायम ठेवले आहे.

देशातील या शैक्षणिक संस्थांची क्रमवारी ठरविताना विद्यापीठे, सर्व संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र व कायदा असे एकंदर नऊ गट निश्‍चित करण्यात आले होते. त्यांचा दर्जा ठरवण्यासाठी विविध निकष ठरवण्यात आले होते. त्यात अध्यापन, अध्ययन व संसाधने, संशोधन आणि व्यावसायिकता, व्याप्ती व सर्वसमावेशकता, आकलन क्षमता आणि पदवीसंदर्भातील निकाल अशा निकषांचा समावेश आहे. त्यांच्या परीक्षणातून ही यादी तयार केली जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.