सावरकरांना भारतरत्न न दिल्याबद्दल शिवसेनेचे मोदींवर टीकास्त्र

मुंबई: मोदी सरकारने स्वातंत्र्यवीर सावकर यांना भारतरत्न पुरस्कार घोषित न केल्याने शिवसेनेने सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मोदींच्या काळातही सावरकर दुर्लक्षित होत असतील ते दुर्देवी आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. आपल्या मुखपत्राच्या अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की भुपेन हजारीका यांच्या सारख्यांना भारतरत्न किताब केवळ आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेऊनच जाहीर केला आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपुर्वी मोदी यांना पत्र लिहुन सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती. पण या मागणीकडे मोदी सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले. या अनुषंगाने शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे की कॉंग्रेसच्या काळात सावकरांचा अवमान झाला. पण मोदी सरकारने तरी सत्तेवर येऊन यापेक्षा वेगळे काय केले. विरोधात असताना भाजप नेहमी सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा म्हणून आग्रही असायची. पण या मोदी सरकारच्या काळात ना अयोध्येत राम मंदिर बांधले गेले ना सावरकरांना भारतरत्न मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदींनी अलिकडेच अंदमानातील कारागृहात जाऊन सावरकरांच्या कोठडीत दर्शन घेऊन तेथे काही काळ ध्यानधारणा केली होती त्याचा संदर्भ देऊन शिवसेनेने म्हटले आहे की त्यांची ही सारी ध्यानधारणा समुद्राच्या लाटेबरोबर वाहून गेली आहे. प्रणव मुखर्जी यांना देण्यात आलेल्या भारतरत्नचा मात्र त्यांनी कौतुकाने उल्लेख केला आहे. आणि आपल्याच निवडीचा त्यामुळे सन्मान झाला आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. भाजपचा विरोध असतानाही शिवसेनेनेच प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला होंता असेही यात अभिमानाने नमूद करण्यात आले आहे. जर मुखर्जींना तुम्ही भारतरत्न देता तर त्यांना राष्ट्रपतीपदाची दुसरी टर्म का दिली नाही असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. तसे झाले असते ते मुखर्जी बिनविरोध निवडून आले असते असेही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)