सावधान! ध्वनी प्रदूषण वाढतेय!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड हे सध्या झपाट्याने वाढणारे शहर आहे. शहरात बांधकाम व वाहनांच्या संख्येतील वाढ देखील लक्षणीय आहे. यामुळे वायू प्रदुषणा बरोबरच ध्वनी प्रदूषण देखील वाढत आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवाल 2017-18 नुसार औद्योगिक क्षेत्राबरोबरच रहिवासी क्षेत्रात देखील ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढली आहे. मानांकापेक्षा 30 ते 40 डेसीबलने ही पातळी अधिक असल्याने ती मानवी आरोग्यासाठी घातक मानली जाते.

या अहवालानुसार औद्योगिक क्षेत्रातही ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढली असून त्या भागातील स्थिती ही गंभीर आहे. अहवालानुसार भोसरी एमआयडीसी क्षेत्रात हेप्रमाण दिवसा 80.4 डेसीबल एवढे आहे तर रात्री 77.3 एवढी आहे जी दिवसा 75 तर रात्री 70 डेसीबल असणे अपेक्षीत आहे. या अहवालानुसार दिवसा ध्वनी पातळी जास्त वाढली असून रस्त्यावरील वाहने, वर्दळ ही त्यास कारणीभूत आहे. अहवालातील परिक्षण हे मुख्य चौक व रसत्यांवर केले गेले असल्यामुळे रात्रीच्या वेळीही प्रदुषणात वाढ झालेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निगडी-प्राधिकरण हा भाग शहरातील शंभर टक्के रहिवासी भाग मानला जातो. शहरातील सर्वाधिक विकसित परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच भागातील ध्वनी प्रदुषणाची पातळी ही ऑगस्टच्या काळात दिवसा 91 तर रात्री 70 अंश डेसीबल एवढी वाढते. ही ध्वनी पातळी घातक असून मानांकानुसार ती दिवसा 55 तर रात्री 45 अंश डेसीबल एवढी अपेक्षीत आहे. त्यामुळे निगडीकरांच्या आरोग्याचा विचार करता हे ध्वनी प्रदूषण कमी होणे गरजेचे आहे. शहरात दिवसा असणारी ध्वनीची पातळी ही सरासरी 75 ते 80 डेसीबल एवढी आहे. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो. डोके दुखीचे प्रमाण देखील वाढते. तर निगडी प्राधिकरण येथे असणारी ध्वनीची पातळी ही बहिरेपणे देखील आणू शकते.

ध्वनी प्रदुषणाची मुख्य कारणे
– शहरातील वाढते नागरीकरण
– वाहनांची वाढती संख्या
– शहरातील वाढते बांधकाम व्यवसाय
– वाढते उद्योग व कंपन्या
– गल्लो-गल्ली साजरे केले जाणारे उत्सव

उत्सव काळात वाढणारे प्रमाण
वेगवेळ्या जयंती, धार्मिक उत्सव हे साजरे करण्यात काही वावगे नाही पण हे साजरे करत असताना जर मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असेल तर सर्वांनीच विचार करणे गरजेचे आहे. कायदेशीर नियमानुसार रात्री 10 नंतर ध्वनी क्षेपके बंद होणे किंवा दिवसभर ही ठराविक आवाजात ध्वनी क्षेपकावर गाणी लावणे अपेक्षित असते. मात्र तसे होत नाही यामुळे शहरातील उत्सव हे डोके दुखीचे कारण ठरत आहेत.

वाहने, बांधकामे, उत्सव आदींमुळे ध्वनी प्रदूषण वाढत आहे. हे प्रदूषण केवळ एक घटक रोखू शकत नाही तर त्यासाठी लोकप्रतिनिधी, महापालिका, वाहतूक विभाग व समाज यांनी एकत्रीत येवून काम करणे गरजेचे आहे. मुळात ज्या महापालिकेने हा अहवाल सादर केला आहे, त्याच महापालिकेने कायद्याच्या जोरावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. जेणेकरुन ध्वनी प्रदुषणाला आळा बसेल. अन्यथा या घटकाकडे दुर्लक्ष करणे हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्या सारखे आहे.
– डॉ. सचिन पुणेकर, पर्यावरण तज्ज्ञ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)