सायनाच्या भूमिकेतील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक

भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात श्रद्धा कपूर सायनाची मुख्य भूमिका साकारत असून तिने स्वत: आपला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात ती हुबेहुब सायनासारखी दिसत आहे.
या फोटोत श्रद्धाने हातात बॅडमिंटन रॅकेट घेऊन बॅडमिंटन कोर्टमध्ये उभी असल्याचे दिसून येत आहे. तसेच खेळाबद्दल असेलले तीचं प्रेम, भाव, जीद्द श्रद्धाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते हे करणार आहेत. याआधी त्यांनी “तारे जमीं पर’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या बायोपिकसाठी श्रद्धा कपूर खूप मेहनत घेत आहे. श्रद्धा रोज सकाळी लवकर उठून बॅडमिंटनचे ट्रेनिंग घेत. यावर ती म्हणते की, या बायोपिकसाठी मी बॅडमिंटनचे 40 क्‍लासेस केले आहेत. बॅडमिंटन हा खेळ खूप कठीण आहे, पण मी खूप एन्जॉय करत आहे. तसेच सायनाचा जीवनप्रवास खूप इंटरेस्टिंग असल्याचेही श्रद्धाने सांगितले.
स्वत:च्या आयुष्यावरील चित्रपटाबाबत सायना म्हणाली, “मला माहित होते की, माझ्या आयुष्यावर चित्रपट बनविण्यात येत असल्याने मी आनंदी आहे. श्रद्धा खूप सुंदर आणि मेहनती आहे. मला पूर्ण खात्री आहे की, श्रद्धा अत्यंत उत्तमपणे भूमिका साकारेल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)