सामुदायिक विवाह सोहळ्यास मोहटादेवी देवस्थानची 5लाखाची देणगी

जिल्ह्यातील अनेक संस्थांकडून देणगी ः अनेकांनी उचलली वस्तूरुप देणग्यांची जबाबदारी
नगर – श्री. जगदंबा देवी सार्व. ट्रस्ट मोहटे , ता.पाथर्डी यांच्या वतीने आज धर्मादाय उपायुक्त कार्यालयात सामुदायिक विवाह सोहळ्या साठी रूपये पांच लाखाचा धनादेश अधिक्षक उत्तम गावडे यांचेकडे विश्‍वस्त भास्करराव सांगळे यांनी सुपुर्द केला. यावेळी धर्मादाय उप आयुक्त हिराताई शेळके , सहायक धर्मादाय आयुक्त बी टी येंगडे व व्ही बी धाडगे सह सामुदायिक विवाह समितीचे सदस्य उपस्थित होते
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने दि 1 मे 2018 रोजी येथील ओम गार्डन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जिल्हयातील अनेक संस्थांनी मदत केली असून यामध्ये श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे एक लाख, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट एक लाख , श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान 51 हजार,जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज एक लाख , देवगड देवस्थान 51 हजार, माळीवाडा गणपती देवस्थान 51 हजार आदी संस्थांनी देणगी दिली आहे तर एक देणगीदाराने सर्व वधूच्या मणीमंगळसूत्राची जबाबदारी उचलली आहे , पवार कुटूंबियांनी ओम गार्डन विनामूल्य उपलब्ध करून दिले असून नरेंद्र फिरोदीया यांच्या संस्थेकडून सर्व वर याना पूर्ण पोषाख व उपस्थित वधु – वराकडील वऱ्हाडी मंडळींना छायाताई फिरोदिया यांच्या संस्थेकडून जेवण देण्यात येणार आहे
राज्य धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून पूर्ण राज्यात असा उपक्रम राबविण्यात येत असून नगर मधील पहिलाच विवाह धर्मदाय सहआयुक्त शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने मोठा सामाजिक उपक्रम असून यामध्ये सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)