सामाजिक बांधिलकीतून विधायक कामांना प्राधान्य – रवींद्र भेगडे

तळेगाव दाभाडे : रवींद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना मान्यवर व कार्यकर्ते.

तळेगाव दाभाडे – समाजातील गरीब, गरजू व वंचितांना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 100 टक्के समाजकारणातूनच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व वैद्यकीय क्षेत्रात सलग कार्य करून अनेकांच्या समस्या सोडवित आहे. मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून मागील पाच वर्षांपासून समाजातील अनिष्ठ प्रथांना बगल देत सामुदायिक विवाह सोहळ्यात शेकडो जोडप्यांचा विवाह केला. मावळ तालुक्‍यातील मागास जातीच्या कुटुंबांना जातीचे दाखले मिळवून दिले. मावळ तालुक्‍यात सामाजिक कार्य करताना माणसांना जोडता आल्याचे समाधान मिळाले, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केले.

तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बुधवारी (दि.25) आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक रघुवीर शेलार म्हणाले की, रवींद्र भेगडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजप युवा मोर्चा तसेच मावळ प्रबोधिनी माध्यमातून विविध विकास कामे, केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक व सार्वजनिक योजना राबविल्या आहेत. रवींद्र भेगडे यांची सर्वसामान्य नागरिकांपासून ते युवा वर्गात सक्षम नेतृत्व म्हणून ओळख आहे.
उपस्थित युवक व जनसमुदायात रवींद्र भेगडे आगामी मावळ विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सुरू होती. तसेच रवींद्र भेगडे यांची मावळ तालुक्‍यातील पवन मावळ, नाणे मावळ, आंदर मावळ, देहूरोड, तळेगाव दाभाडे, लोणावळा आदी परिसरात कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. वाढदिनी युवा वर्गासह, वारकरी, महिला, नागरिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

या वेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, भाजप तालुका प्रभारी भास्कर म्हाळसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब वरघडे, मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्ष रोहिदास महाराज धनवे, ह.भ.प. नंदकुमार भसे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, नगरसेवक अरुण भेगडे, संतोष भेगडे, अमोल शेटे, प्राची हेंद्रे, देहूरोड नगरसेवक रघुवीर शेलार, गजानन शेलार, गोपीचंद गराडे, उद्योजक विलास शिंदे, भरत नायडू, भाजप तालुका कार्याध्यक्ष अजित आगळे, भाजप तळेगाव अध्यक्ष संतोष दाभाडे, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी सभापती राजाराम शिंदे, माजी उपसभापती गणेश गायकवाड, नामदेव भसे, भगवान भसे, विहिप जिल्हाध्यक्ष संदेश भेगडे, विनायक भेगडे, अमित भेगडे, अजित शेलार, संजय वाडेकर, संतोष गु. राक्षे, राजेश मुऱ्हे, विठ्ठल घारे, अरुण लाड यांच्यासह मावळ तालुक्‍यासह पुणे जिल्ह्यातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान भसे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष गु. राक्षे यांनी केले. विनीत भेगडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)