साध्वी, समीर कुलकर्णीचा अर्ज हायकोर्टाकडून मंजूर

खटल्यातून मुक्ततेवर 13 ऑगस्ट रोजी सुनावणी
मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांनी खटल्यातून मुक्ततेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज न्यायालयाने स्विकारला आहे. या अर्जावर 13 ऑगस्ट रोजी सुनावणी निश्‍चित करण्यात आली आहे.

मालेगावात 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात सहा जण ठार, तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर प्रिटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या समीर कुलकर्णी याला पोलिसांनी भोपाळ येथून अटक केली होती.
दरम्यान, उच्च न्यायालयाने समीर कुलकर्णी याला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच या खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचीही या प्रकरणातून जामीनावर मुक्तता झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)