साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ; निवडणूक आयोगाकडूनही नोटीस

प्रातिनिधिक छायाचित्र

भोपाळ – भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना आज निवडणूक आयोगाने त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत नोटीस बजावले आहे. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काल मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये धारातीर्थी पडलेल्या एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं होतं. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती तसेच समाज माध्यमांवर देखील त्यांच्याद्वारे करण्यात आलेल्या वक्तव्याचा अनेकांकडून निषेध नोंदविण्यात आला होता.

दरम्यान आता याच पार्श्ववभूमीवर निवडणूक आयोगाने देखील त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून निवडणूक आयोगाकडून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना आपल्या वक्तव्याबाबत एका दिवसाच्या आत खुलासा करण्याचे आदेश एका नोटीसद्वारे देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काल मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, “मी निर्दोष असताना देखील त्यांनी (हेमंत करकरे) मला बॉम्बस्फोट प्रकरणात गोवले होते. मी त्यांना सांगितले होते की, तुमच्या पूर्ण वंशाचा सर्वनाश होईल. बरोबर सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी जेलमध्ये गेले होते त्याच दिवशी सुतक सुरु झाले. आणि बरोबर सव्वा महिन्यांनी दहशतवाद्यांनी त्यांना मारले. त्याच दिवशी त्यांचा अंत झाला.”

https://twitter.com/ANI/status/1119542166303461377

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)