“साधू- संतांचे विचार समजून घ्यावेत’

भवानीनगर- सध्याच्या काळात साधू संताचे विचार जाणणे महत्वाचे आहे. साधू संतानी समाजाच्या विकासासाठी आपले जीवन व्यतीत केले आहे. जाती धर्मातील सर्व लोकांना एकत्र आणून त्यांना ज्ञानदानाचे महान कार्य केले. म्हणूनच आज सर्व ठिकाणी तुकाराम महाराज बीज मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, असे मत बारामती टेक्‍सस्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्‍त केले.

काटेवाडी (ता. बारामती) येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने तुकाराम बिजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. यावेळी हभप गोविंद महाराज गायकवाड आळंदीकर यांचा भारुडाचा कार्यक्रम पार पडला. श्री व सौ स्वप्नील काटे यांच्या हस्ते नांद्रक वृक्ष अभिषेक करण्यात आला. श्री व सौ ऋषिकेश काटे, निखील काटे, अजित सोलनकर, महादेव कढणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व मूर्ती अभिषेक करण्यात आला.

हभप प्रितम महाराज माने (मठाचीवाडी) यांचे कीर्तन, वैकुंठगमन अभंग, पुष्पवृष्टी व आरती प्रकाश काटे, विद्याधर काटे यांच्या हस्ते करण्यात आली. कै. ह.भ.प. श्रीकांत काटे यांच्या स्मरणार्थ विधाधर काटे व वैभव काटे यांच्या वतीने बीजेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच प्रियांका देवकाते, नानासाहेब काटे, मारुती काटे, प्रकाश काटे, शीतल काटे, दत्तात्रय काटे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.