साताऱ्यात मंगळवारी एकदिवसीय जलदगती बुध्दीबळ स्पर्धा

खुल्या जलदगती बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन
सातारा – थ्री-टू-वन चेस ऍकॅडमीकडून सातारा जिल्हा बुध्दीबळ संघटनेच्या मान्यतेने सातारा नगर परिषदेचे-छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, शिर्के पटांगण गुरुवार पेठ; सातारा शहर’ येथे करण्यात आले आहे, या स्पर्धेचे सलग 8 वे आयोजन आहे. स्पर्धेची सुरुवात मंगळवार दि. 2 ऑक्‍टोबर रोजी, माजी नगराध्यक्षा- सुजाता राजेमहाडीक यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता उद्‌घाटन होईल.आंतरराष्ट्रीय नियमानुसार या स्पर्धेचे आयोजन होत असते,- ही स्पर्धा खुल्या गटात स्विस लीग (साखळी पध्दतीने) खेळवली जाणार असून खुल्या वयोगटाला वयाची अट नाही, कोणत्याही वयाचा ज्याला बुध्दीबळ खेळता येते असा कोणताही खेळाडू यात सहभाग घेऊ शकतो.

बक्षिसे खालील प्रमाणे:
खुल्या गटासाठी – क्र. 1. रु.3000 व चषक, क्र.2.रु.2000 व चषक, क्र.3.रु.1100 व चषक, क्र.4.रु.700, क्र.5. रु.500, क्र.6 ते 10.-रु.400
खुल्या गटामध्ये खास बक्षिसे सर्वोत्कृष्ट जेष्ठ खेळाडू – रु.401/- व चषक, सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू – रु. 401 व चषक सर्वोत्कृष्ट अनरेटेड खेळाडू – रु.401/.व चषक
तसेच 19 वयोगट – क्र. 1. रु.1000 व चषक,क्र. 2. रु. 700 व चषक, क्र. 3. रु.500 व चषक आणि वयोगट 7,9,11,13,15 या गटात प्रथम, द्वितीय, तृतीय यांना आकर्षक चषक व खास चेस मेडल ,तसेच 19 वयोगटामध्ये खास बक्षिस – सर्वोत्कृष्ट युवती बुध्दीबळ खेळाडू साठी रु. 401 व चषक, अशी एकुण 37 रोख रक्कम व चषक अशी बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सदर स्पर्धेत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, मिरज, बेळगाव, सुरत इ. शहरातील नामांकित आणि आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ खेळाडू सहभागी असून, आतापर्यंत 70 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी लवकरात लवकर सहभाग नोंदवून आपल्या चांगल्या खेळाचे प्रात्यक्षिक सर्वांना दाखवावे ही अपेक्षा आहे. स्पर्धा ठिकाणी त्या दिवशी स. 8 ते 10 नावनोंदणी चालू आहे, स्पर्धा प्रवेशासाठी प्रणव सर यांच्यांशी संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)