साताऱ्यात बाराशे विद्यार्थ्यांनी साकारला भारताचा नकाशा

मतदान करण्याचे केले आवाहन
विक्रमाची चिल्ड्रेन्स रेकॉर्डमध्ये नोंद

सातारा  – राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला साताऱ्यात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 200 × 200 एवढा भव्य मानवी प्रतिमांचा भारतीय नकाशा आणि मतदान करा ” हा संदेश साकारण्यात आला. याची नोंद ग्लोबल रेकॉर्ड रिसर्च फौंडेशनच्या चिल्ड्रेन्स रेकॉर्डमध्ये करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विश्‍वविक्रमाचे प्रमाण पत्र प्रदान प्रसंगी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, अनेक विश्‍वविक्रम ज्यांच्या नावावर आहेत, असे डॉ. दीपक हारके, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका बी. के. सुवर्णा, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी पुनम मेहता, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, जावलीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे, क्रीडा अधिकारी युवराज नाईक, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.

या मानवी नकाशासाठी जे 1200 विद्यार्थी सहभागी झाले त्यात साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, छत्रपती शाहू अकादमी, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर, महाराजा सयाजीराव विद्यालय, सेंट पॉल स्कूल, शानबाग स्कूल, जे. डब्ल्यू. आयर्न अकादमी या शाळांचे विद्यार्थी होते.

भारताचा अतिशय सुबक 200 × 200 फुटांच्या नकाशाचे आरेखन कलाशिक्षक विनायक संकपाळ, गजानन पाडळे, सागर सुतार, घनश्‍याम नवले, क्रीडा शिक्षक सर्वश्री आर. व्ही. माने, संजय अहिरेकर, व्ही. जे. यादव, एस. एम. बारंगळे आदीनी यासाठी काम केले. या कार्यक्रमाच्या संयोजनात साताऱ्याच्या उपविभागीय अधिकारी स्वाती देशमुख, जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे, जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) शबनम मुजावर यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)