साताऱ्यात दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घरफोडी

लाखो रुपयांचा ऐवज लांबवला
सातारा,दि.23(प्रतिनिधी)
सातारा शहरातील गजबजलेल्या प्रतापगंज पेठ, निसर्ग कॉलनी परिसरात चोरट्यांनी हात साफ केल्याच्या दोन घटना घडल्या. यात लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जरंडेश्‍वर नाका परिसरातील निसर्ग कॉलनी, प्रतापगंज पेठेतील काळेश्‍वरी अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. यातील निसर्ग कॉलनीतील दीपक आप्पाजी चव्हाण यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 55 हजारांचा एवज लंपास केला. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार करत आहेत. तर दुसऱ्या घटनेत प्रतापगंज पेठेतील काळेश्वरी अपार्टमेंटमधील जयंत काटे यांचा फ्लॅट सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास फोडुन चोरट्यांनी रोख रक्कम पस्तीस हजार व दीडशे ग्रॅम चांदीचे दागिने लंपास केले. या चोरीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा किर्दत करत आहेत. वरील दोन्ही ठिकाणी घरात कोणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. दोन्ही ठिकाणी झालेल्या चोऱ्या करण्याची पध्दत सारखीच असल्याने एकाच टोळीने सातारकरांची झोप उडवल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच साताऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पुष्पा किर्दत यांच्यासह गुन्हे प्रकटीकरणच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×