सातारा : हॉटेल, शाळेत चोरी करणाऱ्याला मुद्देमालासह अटक

सातारा : सातारा शहरातील एका उपनगरात असणाऱ्या हॉटेल व शाळेमध्ये चोरी करणाऱ्या संशयीत चोरट्याला सातारा शहर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. चंदननगर येथील हॉटेल कृष्णा बार येथील सी.सी.टिव्ही कॅमेरे चोरल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी संशयीत चोरटा निकेत वसंत पाटणकर याला ताब्यात घेतला होता.

दरम्यान त्याला न्यायालयात हजर केला असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. संशयीताला कोठडी मिळाल्यानंतर शहरचे पोलिस वरिष्ठ पो.नि.नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नानासाहेब कदम व सहा.फौजदार डी.वाय. कदम, गुलाब जाधव जाधव, अनिल स्वामी, पंकज ढाणे यांनी अतंत्य बारकाईने तपास करत संशयीताकडे तपास करत लोकमंगल हायस्कुलच्या संगणक कक्षातील संगणक व इतर साहित्य हस्तगत करून अवघ्या पाच दिवसात या चोरीचा छडा लावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)