सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेची उत्कंठा शिगेला

अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उद्या भव्य एक्‍स्पो

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) –
सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी ही पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा ही येत्या रविवारी म्हणजे दिनांक 2 सप्टेंबर 2018 रोजी आयोजित केली आहे. या स्पर्धेचे हे 7 वे वर्ष आहे.
या संदर्भात शनिवार दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत भव्य एक्‍सपोचे आयोजन केले आहे. यावर्षीच्या स्पर्धेचा एक्‍स्पो शेंद्रे येथील अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे स्पर्धकांनी नोंद घ्यावी. या भव्य एक्‍सपोचे उदघाटन शनिवारी सकाळी 8.30 वाजता सातारचे आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले व सौ वेदांतिकाराजे भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या एक्‍सपोमध्ये धावपटूंना आवश्‍यक ते सर्व रेस किट वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये टी शर्ट, बीब क्रमांक, संगणकीकृत टाईमिंग चिप इत्यादींचा समावेश आहे. परंतु त्यासाठी सर्व स्पर्धकांनी स्वतःचे पैसे भरल्याची मूळ पावती अथवा स्वतःच्या मोबाइलवर आलेला मेसेज दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच स्वतःचा फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे आवश्‍यक आहे असे आवाहन रेस डायरेक्‍टर डॉ देवदत्त देव तसेच सातारा रनर्स फौंडेशनचे अध्यक्ष श्री सुजित जगधने, उपाध्यक्ष डॉ प्रतापराव गोळे व सचिव डॉ सुचित्रा काटे यांनी केले आहे.
यावर्षीच्या स्पर्धेचे रेस डायरेक्‍टर डॉ देवदत्त देव हे साताऱ्यातील उत्कृष्ट मॅरेथॉन धावपटू असून त्यांनी 26 अर्ध मॅरेथॉन, 6 फुल मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्या असून, अर्धमॅरेथॉनचे अंतर त्यांनी 1.53 मिनिटात पूर्ण असून, फुल मॅरेथॉन स्पर्धे 4.13 मिनिटात पूर्ण केले आहे. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजन ते 2013 सालापासून सक्रिय आहेत.

पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे 7 वे पर्व यशस्वी होण्यासाठी सर्व सातारकरांनी या उपक्रमाच्यानिमित्ताने साताऱ्यात दाखल होणाऱ्या आपल्या पाहुण्यांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांना मदत करावी व ऐतिहासिक सातारा नगरीचा लौकिक वाढवण्यामध्ये सातारा रनर्स फौंडेशनच्या सर्व संचालकांच्या प्रयत्नांना हातभार लावावा असे या आवाहन संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काटे व रेस डायरेक्‍टर डॉ- देवदत्त देव तसेच सातारा रनर्स फौंडेशनचे अध्यक्ष श्री सुजित जगधने, उपाध्यक्ष डॉ प्रतापराव गोळे, तसेच माजी अध्यक्ष अड कमलेश पिसाळ, डा.शेखर घोरपडे, सीए विठ्ठल जाधव व सचिव डॉ सुचित्रा काटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)