सातारा : संदीप पाटील यांच्या बदलीने सातारकरांना हुरहुर

सोसल मीडियावर संतप्त भावना; कार्यकाल वाढवण्याची मागणी

जिल्ह्यातील भल्या भल्या गुंडाना कृष्णेचे पाणी पाजत थेट तुरूगांत पाठवणाऱ्या जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील अर्थात सातारकरांच्या मानातील सिंघम यांच्या बदलीने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांनी तर याबदलीला राज्य सरकारला जबाबदार धरून सरकाचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल विचारला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एसपी संदीप पाटील यांनी जून मध्ये सातारा जिल्ह्याचा कार्यभार घेतला. त्याअगोदर ते संवेदनशील असणाऱ्या गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक होते. गडचिरोलीतून साताऱ्यात हजर होत असताना त्यांनी “बुके नको बुक आणा” असे सातारकरांना आवाहन केले आणि जिल्हावासियांनीही त्यांची एक पुस्तक देऊन भेट घेतली. जमा झालेली ही सर्व पुस्तके त्यांनी गडचिरोली येथील नागरिकांना वाचण्यासाठी पाठवून एक नवा पायंडा घातला. अशा पद्धतीने त्यांनी ‘पुस्तकप्रेमी’ म्हणून आगमन केले आणि दोन वर्षाच्या कालावधीत सातारा शहरासह जिल्ह्यातील सावकारी, खंडणीखोर, गुंडगिरी, पर्यटनस्थळी लुटणारी टोळी या गुन्हेगारीचा अक्षरशः बिमोड केला.

एसपी संदीप पाटील यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे नामचीन गुंडापासून गल्लीबोळातील हुल्लडबाजापर्यंत भले भले दबकून होते. थोडी जर गडबड झाली की मोक्का लागणार किंवा तडीपार होणार अशी पोलिसांची गुन्हेगारांवर दहशत निर्माण झाली होती. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच सातारा जिल्ह्यातील क्राईमरेट कमी झाला. एसपी संदीप पाटील यांच्या या ठोस कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

देशातील पहिले ‘स्मार्ट सातारा पोलिस दल’ करण्याची किमयाही त्यांनी करून दाखवली आहे. दरम्यान, एसपी संदीप पाटील यांना आणखी एक वर्षाचा कालावधी वाढवून मिळावा, अशी सोशल मीडियातुन सातारा जिल्हावासियांची मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)