सातारा शहर शाखेच्यावतीने उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

सातारा ः गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी.

विद्यार्थ्यांना वह्या, शालेय गणवेषाचे वाटप
सातारा, दि. 27 (प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना सातारा शहर शाखेच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसेना उपनेते, सातारा-सांगली संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख हरिदासजी जगदाळे, तालुका प्रमुख दत्ता नलावडे, सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी 11.30 वाजता नगरपालिका शाळा क्र. 1 आणि क्र. 2 (प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा) येथे शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पवार, सौ. नलिनी वाडते यांच्या उपस्थितीत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना 2000 वह्या वाटप, शालेय गणवेश व चित्रकला साहित्य वाटप करण्यात आले. दुपारी 12.30 वाजता आर्यांग्ल हॉस्पिटलमध्ये देवी सर व निकम सर यांच्या उपस्थितीत रुग्णांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख आण्णा देशपांडे, उपतालुकाप्रमुख रमेश बोराटे, गिरीष सावंत, शिव वाहतूक सेना तालुकाप्रमुख सचिन जगताप, उपशहरप्रमुख शिवाजीराव इंगवले, सागर धोत्रे, शहर विभाग प्रमुख सुनील भोसले, संतोष निगडकर, नितीन लकेरी, संग्राम कांबळे, शिवसेना विभागप्रमुख संजय गायकवाड, प्रतीक शेडगे, राजू नाईक, बापू तोरस्कर, सुनील भोसले, मनोज नलवडे, संदीप नलवडे, निलेश पवार, धनंजय माने, आशुतोष पारंगे, सुनील यादव, मयूर खापे, प्रभाकर पवार, राजेंद्र शिंदे, सर्व आजी-माजी पदाधिकारी, युवा सेना, विमा सेना, एस. टी. कर्मचारी सेना, शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)