सातारा: विडणीत पावसाचे थैमान

विडणी – विङणी परिसरात रविवारी रात्री 9 च्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतातील, मका, ऊस, कढवळ व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्कल बडबडे तलाठी मॅडम, शेंदे पो. पाटील धनंजय नेरकर कृषी सहायक डबडे यांनी केलेल्या पंचनामानुसार अधिक माहिती अशी की, उत्तरेश्वर रोपवाटिकेचे पॉली हाऊसचे साधारण 25 लाखाच्यावर नुकसान झाले आहे.

अष्टटविनायक रोपवाटिका यांचे साधारण 18 लाखाचे तर विश्वनाथ बनकर यांची पोल्ट्री फॉर्मची भिंत कोसळून त्यामध्ये साधासाधारण 1200 पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. तर शिवाजी जाधव यांची घराची भिंत कोसळली. जोरदार वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता यामध्ये ठिक ठिकाणी विद्युत खांब कोसळले असून काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने भयावह स्थिती निर्माण झाली आहे. प्रशांत शिर्के यांच्या गोठ्याची भिंत कोसळली असुन, अब्दागिरेवाडी येथील रामचंद्र अब्दागिरे, यांच्या घरावरील सर्व पत्रा उडून गेला. या वादळामुळे मुख्य रस्त्यावर झाडे उन्ममळुन पडल्यामुळे वाहतुक ठप्प झाली होती, त्यामुळे वाहन धारकांची एकच तारांबळ उडाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वादळी वाऱ्यासह पाऊसाचे तांडव सुमारे 1 तास चालु असल्यामुळे परिसरातील नागरिकांची व लहान मुलांची घाबरगुंडी उडाली. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाण्यासाठी नागरिकांना विहीर, कॅनॉलकडे धाव घ्यावी लागली. रात्री उशिरापर्यंत पंचनामे करण्याचेकाम सुरू होते सदर नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शासनाने नुकसानग्रस्तांना जास्तीतजास्त मोबदला द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)