सातारा : वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईचे संकट

संग्रहित छायाचित्र

वाई तालुक्‍यातील गावांमधून टॅंकरचे प्रस्ताव

मेणवली- मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. गत आठवड्यापासून तर पार 40 अंशावर जात आहेत. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत झपाट्याने आटू लागले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली असून अनेक गावांमधून पाणी टॅंकर सुरु करण्याचे मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीत धडकू लागले आहेत. दरम्यान, टंचाईग्रस्त गावांना तात्काळ पाणी टॅंक़र उपलब्ध करुन पाणीप्रश्‍न सोडविणार असल्याचे वाई पंचायत समितीच्या अधिकृत सूत्रांकडून सांगितले जात आहे.

वाई तालुक्‍यात सरासरी 250 ते 900 मिमी. इतके पर्जन्यमान असूनही काही गावे दरवर्षी टंचाईग्रस्त होतात. वाईच्या पश्‍चिम भागात भरपूर प्रमाणात पाऊस पडत असला तरी पूर्व व उत्तर भागात मात्र फक्त 25% इतकाच पाऊस पडत असल्याने येथील भागातील गावांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

सद्यस्थितीत या गावातील पाण्याचे स्तोत्र पूर्णत: आटून चालल्याने त्याना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले असून ग्रामस्थांच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे वाई पंचायत समिती कडून सांगितले.

तालुक्‍यातील पाणी टंचाई घोषित गावांची एकूण संख्या 29 असून यामध्ये आसले, गुंडेवाडी, बालेघर, धावडी, आनंदपूर, बोपर्डी, चांदक, सुरूर, कवठे परखंदी, भुईंज, गाढवेवाडी, विठ्ठलवाडी मोहरेकरवाडी, जांब, चांदवडी (पुनर्व), देगाव, आकोशी, सुलतानपुर, मुंगसेवाडी मांढरदेव, शिरगाव, कडेगाव, कोंढावळे, वयगाव, दह्याट, वेळे, केंजळ, गुळुंब या गावांचा समावेश आहे. यातील गुंडेवाडी वाघमळावस्ती (धावडी), मांढरदेव- गडगेवाडी, (मांढरदेव)-बालेघर, विठ्ठलवाडी (कुसगाव) या सहा गावांचा टॅंकर प्रस्तावाबरोबरच या गावांना लागणाऱ्या पाण्याकरता सुलतानपुर,
परखंदी व वाईतील पाडळे विहिरींचे अधिग्रहन, प्रस्तावही तहसीदार कार्यायाकडे सादर करण्यात आले आहेत. तर वेरूळी व डुईचीवाडी ही दोन गावे टंचाईग्रस्त घोषित नसल्याने गावातील विहिर अधिग्रहण मागणी प्राप्त प्रस्ताव सादर करता आलेले नाहीत. नळ पाणी पुरवठा विशेष दुरूस्ती योजनेअंतर्गत आसले (गोंधळेवाडी), आसले (पिराचीवाडी), कडेगाव, बोपर्डी (धनगरवाडी) या चार गावांची मंजुरी करण्यात येवून विहीरी खोलीकरण व गाळ काढण्यासाठी परखंदी, सुलतानपूर, मुंगसेवाडी या गावांची निश्‍चिती केली गेली आहे.

तसेच धावडी (वाघमाळवस्ती), वयगाव, कोंढावळे (देवरूखवस्ती), आकोशी व दह्याट येथील नळपाणी पुरवठा दुरूस्ती काम लकरच सुरू करण्यात येवून आकोशी, कोंढावळे (देवरूखवस्ती) चे विशेष दुरूस्ती अंदाज पत्रक सादर केले आहे. या कामांसह संभाव्य टंचाई घोषित गावांमध्ये वेरूळी, घेराकेंजळ, वहागाव, ओहळी, वासोळे, लगडवाडी, खोलवडी, निकमवाडी, व्याजवाडी या नऊ गावांची नावे निश्‍चित करण्यात येवून प्रस्तावित 27 गावे व 12 वाड्या वस्त्या धरून एप्रिल 2018 ते मे 2018 अखेर संभाव्य पाणीटंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)