सातारा: लोकसभेला साहेब घेतील तो निर्णय मान्य

सात जूनला जिल्हाध्यक्ष निवड
एक बुथ, दहा यूथ या संकल्पनेतून आगामी काळात राष्ट्रवादी युवकची बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी युवकचा मेळावा एक जूनला साताऱ्यात होणार आहे. या मेळाव्यास वि.प.सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पक्ष निरिक्षक सुरेश घुले, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी पक्षातील सर्व सेलच्या अध्यक्षांची बैठक होणार असून या बैठकीत राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर कार्यकारिणीत काम करण्यास इच्छुकांची माहिती घेऊन त्यांची नावे अंतिम केली जाणार आहेत. सात जूनला जिल्हाध्यक्ष पदाची निवड जाहीर होईल. त्यासाठी सुनील माने यांच्या नावाचीच शिफारस केली आहे. त्यानंतर तालुकाध्यक्ष व कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे असे ही आ.शिंदे यांनी सांगितले.

आ.शशिकांत शिंदे: दिल्लीपेक्षा गल्लीतील हवा चांगली असल्याचे मत

सातारा – खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यांच्यात आणि आमच्यात काही कारणांनी मतभेद,असतील पण आमच्यात मनभेद नाहीत.लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्याबाबतीत पक्षाचे अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे मत आ.शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी भवन येथे विविध सेल पदाधिकारी आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, केंद्राच्या निर्णयानुसार दोन आमदारांचे कार्यक्षेत्रात मेडिकल कॉलेज होत असल्याने याला केंद्राचा निधी मिळू शकतो. पण त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा होणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही लोकसभेत जाणार का, असे पत्रकारांनी विचारले असता आ.शिंदे म्हणाले, पक्षातील आणि मिडियातील सर्वचजण मला लोकसभेत जावा असे म्हणत आहेत. पण दिल्लीपेक्षा गल्लीतील हवा मला चांगली आहे. मी माझ्या मतदारसंघातच योग्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार नरेंद्र पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. एखादा आमदार विकास कामांसाठी मंत्र्यांशी जवळीक ठेऊ शकतो. त्यामुळे त्यांने पक्षात प्रवेश केला असे म्हणता येत नाही. कॉंग्रेसचे आमदार आनंदराव पाटील यांनी कोठून हा शोध लावला हे माहिती नाही. पण नरेंद्र पाटील यांनी अद्याप निर्णय घेतलेला नसताना त्यांच्यावर संशय घेणे योग्य नाही. माथाडीत सर्व पक्षीय कामगार आहेत. पण माथाडीची ताकद ओळखून भाजपकडून असे प्रयत्न सुरू असतील, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)