सातारा: राज्यमंत्रीपदाचा दर्जा देउन विठ्ठल भक्तांचा बहुमान

डॉ. ना. अतुल भोसले यांचे कराडात जंगी स्वागत : कार्यकर्त्यांचा जल्लोष

कराड – पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना महाराष्ट्र शासनाकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मंदिर समितीच्या इतिहासात मंदिर समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ असून महाराष्ट्र शासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन तमाम सातारा जिल्ह्यासह राज्यातील आणि राज्याबाहेतील विठ्ठल-रुक्‍मिणी भक्तांचा बहुमान केला असल्याचे मत विठ्ठल रूक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. नामदार अतुल भोसले यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यानंतर कराड येथे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून भाविक भक्तांच्यासाठी सोयीसुविधा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांतदादा पाटील व ना. रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये दर्शनासाठी टोकण व्यवस्था आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्यामुळे दर्शन सुलभ होणार आहे. त्यासाठी आगामी एकादशी पर्यंत टोकण व्यवस्था ही प्रायोगिक तत्वावर करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या कराड तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्‍या नेत्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याबद्दल नामदार डॉ. अतुल भोसले यांचे तासवडे टोलनाक्‍यावर मोठे जंगी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी अतुल बाबांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनीही महामार्गावर बाबांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. कोल्हापूर नाक्‍यावर आल्यानंतर बाबांनी महात्मा गांधी आणि दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीला पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कराड दक्षिणसह भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे शहरात जंगी स्वागत केले. सर्व कार्यकर्त्यांमध्ये आपल्या लाडक्‍या नेत्याचा सरकारने राज्यमंत्री पद देऊन केलेल्या सन्मानाबद्दल जल्लोष करताना दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)