सातारा : युवकांच्या अपघातात होणारी वाढ चिंताजनक

परळी : लक्षवेधी हेअर स्टॉईल… हातात महागडं घड्याळ… मनगटात सोन्याचं कडं… डोळ्यावर चकचकणारा गॉगल आणि सोबत ‘हायस्पीड’ची बाईक… दहावी, अकरावीत शिक्षण घेणाऱ्या या बाळाचं वय तरी काय असणारं… फार तर चौदा, पंधरा वर्षाचं… पोरंग नेमकं कॉलेजला जातं की आणखी कुंठ…? पोटासाठी राबणाऱ्या बापाला त्याचं काय भान असणार … पोरगं हाताला आलयं, कॉलेज शिकून आणखी मोठं होईल, ही अपेक्षा स्वाभाविक साऱ्यांचीच असते. चार चौघांत वावरणारं पोरगं ‘हायस्पीड’ बाईक वाऱ्याच्या वेगानं पळवतं… नकळत एखादी दुर्घटना घडते. अन्‌ कष्टातून उभारलेलं सार विश्‍व क्षणात उद्‌वस्त होतं.

सातारा तालुका व जिल्ह्यात विशेष करून ग्रामीण भागात 2015 ते 2017 काळात घडलेल्या छोट्या-मोठ्या अपघातांचे अवलोकन केल्यास सर्वाधिक 13 ते 17 वयोगटातील कोवळी, हातातोंडाला आलेली मुले कायमची जायबंदी झाली आहेत. किमान 29 कोवळी मुले जिवाला मुकली आहेत. जखमीत अल्पवयीन मुलांची वाढती संख्या चिंताजनक 2015-2017 काळात तालुक्‍यातील एकूण 458 घटना घडल्या आहेत. 1 जानेवारी ते 24 मार्च 2018 काळातील 56 घटनांमध्येही अनेक अल्पवयीन मुलांना गंभीर जखमी होण्याचे प्रमाण धक्‍कादायक आहे. त्यात बहुसंख्य मुलांना कायमचं अपंगत्व येऊनही समाजाची मानसिकता बदलताना दिसून येत नाही.

मुलांना महागडी वाहने पुरवून त्यांच्या हौसेपायी अपघाताला निमंत्रण देण्याची नामुष्की ओढावून घेण्याचाप्रकार दिसून येत आहे. कोवळ्या मुलांच्या वाहनांना सर्वाधिक अपघात आणि अल्पवयीन मुलांच्या ताब्यातील वाहनांना सर्वाधिक अपघात झाल्याचे दिसून आले आहे. काही मुलांकडे तर हायस्पीडची वाहने आढळून आली. तर काही मुलांची शरीरयष्ठी लक्षात घेतल्यास वाहनांवर त्यांचे नियंत्रण राहू शकत नव्हते. अशा मुलांच्या ताब्यात महागडी वाहने दिसून येत होती.

थेट पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा तालुक्‍यासह जिल्ह्यातील अपघातांच्या घटना टाळण्यासाठी सातारा पोलिस दलाने अल्पवयीन मुलांची हौस म्हणून त्यांना वाहने पुरविणाऱ्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. तालुका वाहतूक शाखेने दोन दिवसांत 12 पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. बालहट्टापोटी मुलांच्या आयुष्याची खेळण्याचा प्रयत्न प्रशिक्षित, मोटार वाहतूक कायद्याचे ज्ञान असणाऱ्या तरुणांना वाहन देण्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

मात्र, त्या मुलांना वाहनांचा डोलारा सांभाळता येत नाही, त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही, वेगावर ताबा सांभाळणे जीवघेणे ठरते, अशा कोवळ्या वयातील मुलांना वाहने उपलब्ध करून देणे जिविताला घातक ठरण्याचा प्रकार आहे. होणाऱ्या परिणामांची जाणीव असूनही केवळ बालहट्टापोटी मुलांच्या आयुष्यांशी खेळण्याचा प्रकार होतो आहे.

शायनर स्टंटबाज..
अशा घटनांना पालकांनीच पायबंद घालण्याची गरज आहे. कॉलेज कॅम्पसमधील ‘शायनर’ स्टंटबाजांना रोखा. शहर, जिल्ह्यातील बहुतांशी कॉलेज कॅम्पसमध्ये ‘शायनर’ स्टंटबाजांचा धुमाकूळ असतो. वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहनांचे सायलेन्सर काढून कॉलेज भोवताली सतत घिरट्या मारण्याचा काहींचा उद्योग सुरू असतो. वाहतूक नियंत्रण शाखेने प्रथमत: कॉलेज कॅम्पसमध्ये सर्च मोहीम राबवावी, अशी खुद्द पालकांचीच मागणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)