सातारा: महामार्गावर दोन अपघातात आठजण जखमी

नागठाणे – पूणे-बेंगलोर महामार्गावर अतीत व वळसे (ता. सातारा) गावच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आठ जण किरकोळ जखमी झाले. अपघातग्रत वाहाने महामार्गावरच अडकल्याने काही काळ वाहातूक विस्कळीत झाली होती.

बुधवारी सायंकाळी कराडहून पुण्याकडे भरधाव निघालेल्या सॅन्ट्रो कारचालकाचा अतीत येथे ताबा सुटल्याने ती दुभाजकावर चढून पुलाच्या कठड्याला धडकली. यामध्ये गाडीतील चौघे जखमी झाले. यानंतर तासाभराने याच लेनवर वळसे गावच्या हद्दीत हॉटेल इंद्रप्रस्थसमोर महामार्गालगत थांबलेल्या मालट्रकला प्रथम मागून येणारी डस्टर कार जोरात जाऊन आदळली. ती पुढे महामार्गावरील दुभाजकावर जाऊन थांबली. त्याचवेळी आणखी एक झायलो कार डस्टर गादीवर आदळली. या अपघातात चौघे जखमी झाले. वाहने महामार्गावरच थांबल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या दोन्ही अपघातस्थळी बोरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी व हायवे हेल्पलाईनचे दस्तगीर आगा, राजू जाधव व जितेंद्र भोसले यांनी धाव घेत महामार्ग सुरळीत केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)