सातारा : ‘भाजपाने जनतेला देशोधडीला लावले’

पुसेगाव- भाजप सरकारने नोटाबंदी, वाढती महागाई, जी.एस.टी.च्या माध्यमातून शेतकरी, जनता व कामगारांना देशोधडीला लावले आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनतेने भाजप सरकारला सत्तेतून हद्दपार करावे, असा हल्ला सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी केला.

रेवलकरवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायत कार्यालय 10 लाख, स्मशानभूमी शेड 5 लाख या कामांचे भूमिपूजन व साकव पूल 15 लाख या कामाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य प्रदीप विधाते होते. यावेळी माजी सरपंच पै. सागर साळुंखे, पं. स. सदस्य संतोष साळुंखे, मार्केट कमेटीचे संचालक राजेंद्र कचरे, राष्ट्रवादी कोरेगाव विधानसभा अध्यक्ष अरुण माने, माजी पं. स. सदस्य दगडूदादा शिंदे, चंद्रकांत शिंदे, राम जाधव, माजी सरपंच हणमंत कदम, श्रीरंग काटे, विजय बिटले, पै. महादेव लोंढे, सोसायटी संचालक बाळासो कदम, हणमंत मोरे, विठ्ठल सावंत, प्रल्हाद कापसे, राजाराम मदने उपस्थित होते.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, या विभागाचा लोकप्रतिनिधी होण्यापूर्वी खटाव तालुक्‍यातील मुलभूत प्रश्‍नांसह अनेक विकासकामे प्रलंबित होती. डोंगर कपाऱ्यालगत असणाऱ्या वाडीवस्त्यांवरील लोकांचे दुख काय असते हे मी जवळून पाहिले आहे. म्हणूनच वाड्यावस्त्यांवरील कमी-जास्त मतांचा विचार न करता केवळ जनहिताच्या विकासकामांना प्राधान्य दिले. ग्रामस्थांच्या मागण्या लक्षात घेऊन या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी पवनऊर्जा विभागाकडून रेवलकरवाडी रस्ता 94 लाख, आवारवाडी रस्ता 1 कोटी निधी आणून प्रत्यक्षात कामे साकारली आहेत. आगामी काळात विजय बिटले व पै. महादेव लोंढे यांच्या पाठिशी राष्ट्रवादीची सर्व ताकद उभी करणार आहे.

जि. प. सदस्य प्रदीप विधाते, माजी सरपंच पै. सागर साळुंखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पं. स. सदस्य संतोष साळुंखे, सूत्रसंचलन राजेश ढोले तर आभार हरिभाऊ चव्हाण यांनी मानले. यावेळी मुरलीधर कापसे, शिवाजी लोंढे, भानुदास कदम, हणमंत फडतरे, रामदास कापसे, बाळासो फडतरे, विठ्ठल शिंदे, आनंदा कदम, बाबा बिटले, बाळू घाडगे, अनिल माने, नवनाथ जगदाळे, जयवंत यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

रेवलकरवाडी ग्रामपंचायतसाठी जनसुविधेतून 10 लाख निधी मंजूर करुन या कामाचा नारळ सुध्दा मी स्वत: फोडला होता. हा निधी आणण्यात भाजपाच्या नेतेमंडळीचा तीळमात्र संबंध नाही. केवळ श्रेयवादासाठी त्यांनी जाणीवपुर्वक या कामाचा दुसऱ्यांदा नारळ फोडला गेला. शेतात पिक घेण्यासाठी मशागत करुन पेरणी, संगोपन करणारा वेगळा तर आयत्या पिकावर डोळा ठेवण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी करुन नये. रेवलकरवाडीतील या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न करु नये असा इशारा आ. शिंदे यांनी यावेळी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)