सातारा: बॅंकेचा अधिकारी असल्याचे सांगत 50 हजारांची फसवणुक

सातारा – विलास भानुदास काटकर (रा.काटकरवाडी, पुसेगाव ता.खटाव) यांना अज्ञाताने फोन करुन बॅंकेतील मॅनेजर बोलत असल्याचे सांगत मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मागीतला व तो मिळताच याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तक्रारदार काटकर यांच्या बॅंके खात्यातील 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सायबर गुन्हे शाखा येथे दाखल झाली होती. फसवणुक झालेल्या रकमेपैकी तक्रारदाराला 25 हजार परत मिळवुन देण्यात पोलिसांनी यश आले आहे.

बॅंकेचा मॅनेजर बोलतोय असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मागवून खात्यातील 50 हजार रुपये फसवणूक केली होती . दाखल गुन्ह्याचा सातारा सायबर सेल पोलिसांनी तांत्रिक सहाय्याच्या मदतीने तपास गतीमान करुन तक्रारदाराचे 25 हजार रुपये परत मिळवून दिले. दरम्यान, तक्रारदार यांनी ओटीपी क्रमांक शेअर केल्याने त्यांची फसवणूक झाली असून”ओटीपी’ क्रमांक कोणालाही देवू नये, असे आवाहन सातारा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंकेच्या खात्यावरील पैसे गेल्याचा मेसेज तक्रारदार काटकर यांना आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तत्काळ त्यांनी सातारा सायबर सेल पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तपास करुन तक्रारदार काटकर यांचे 24 हजार 999 रुपये मिळवून दिले. स. पो.नि गजानन कदम, पोलिस हवालदार विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव यांनी याचा तपास केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)