सातारा : फसवणुक झालेल्या व्यापाऱ्याला 48 तासात न्याय 

सायबर पोलिसांची कारवाई;ओटीपी क्रमांक मागुन केली होती फसवणुक 
सातारा : पाठवलेल्या पार्सलचे पैसे देण्यासाठी पहिल्यांदा एटीएम क्रमांक नंतर मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मागुन साताऱ्यातील व्यापाऱ्याची 21 हजार 690 रूपयांची फसवणुक झाली होती. त्याचा अवघ्या 48 तासांत तपास लावत सायबर शाखेने फसवणुक झालेले सर्व पैसे संबधीत व्यापाऱ्याला परत मिळवुन दिले आहेत. शनिवारी एका व्यक्तीने फोनवरुन साताऱ्यातील हॉटेल व्यवसायिकाला पाठवलेल्या पार्सलचे पैसे पाठवायचे असल्याने तुमचा एटीएम क्रमांक द्या ,असे सांगत त्यानंतर मोबाईल वर आलेला ओटीपी क्रमांक मागुन त्यांची फसवणुक केली केली होती.

त्यानंतर आपल्या बॅंक खात्यावरून 21 हजार 690 रूपये काढले असल्याचा मेसेज मोबाईलवर आल्याने त्या व्यवसायिकाने सातारा तालुक्‍यात तक्रार दिली होती. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे पो.नि पद्माकर घनवट यांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान एका ऑनलाइन शॉपींग कंपनीच्या संकेतस्थळावरून खरेदी झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कंपनीशी संपर्क साधून फसवणुकीतून झालेली खरेदी रद्द करत फसवणुक झालेल्या व्यवसायिकाला त्याची रक्कम परत मिळवुन दिली आहे.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार,पो.नि.पद्माकर घनवट,विकास जाधव,सपोनि जी.एस.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रांत फडतरे,अमित झेंडे,अजय जाधव,निखील जाधव,सुजित भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)