सातारा : ‘फन फेअर’ला भुरट्या चोरट्यांचे ग्रहण

चोरटे कॅमेऱ्यात कैद तरीही साहित्य मिळण्याची धास्ती

सातारा : कोटेश्‍वर मैदानावर सुरु झालेल्या फन फेअर महोत्सवाला सातारकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच महोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी येथील 15 पत्र्यांच्या पानांची चोरी झाली होती. त्यानंतर पुन्हा काल याठिकाणी आणखी दोन पत्रे चोरण्याचा प्रकार घडला आहे. संबंधित चोरट्याचा फनफेअरचे आयोजक गुप्ता यांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटोही काढला असुन चोरीच्या घटनेची फिर्यादही दिली आहे. मात्र, आता प्रतिक्षा आहे ती चोरीचे साहित्य मिळणार का? या गोष्टीची. दरम्यान, पोलिसांना पुरावे दिल्याने पोलीस काय भूमिका घेणार हे पाहणेही तितकेच महत्वपूर्ण ठरणार आहे.

साहेब चोरी झालीये, माझे 11 पत्रे चोरीला गेलेत. तुम्ही लक्ष द्या की, शेजारच्या झोपडपट्टीमधील कोणी तरी चोरले आहेत, अशी तक्रार फनफेअरचे मॅनेजर प्रकाश गुप्ता यांनी पोलिसात दिली आहे.कोटोश्‍वर मैदानावर दरवर्षी सातारकरांच्या मनोरंजनासाठी परराज्यातूनही कलाकार याठिकाणी येत असतात. जवळ पास महिना-महिना याठिकाणी ते वास्तव्यास असतात. त्यासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशी बाबी पूर्ण करुनही त्यांच्या साहित्याची चोरी करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी कुणी येईका का नाही? याबाबतही साशंकता निर्माण होत असून या व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या अशा भुरट्या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी सातरकर नागरिकांसह व्यावसायिकांमधुनही होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इतर राज्यातून मनोरंजन करण्या हेतून व आपले व्यावसायिक उद्दिष्ट्य साध्य करण्या कर्ता अनेक मंडळी सातारा मध्ये येत असतात. कायदेशीर सर्व बाबीचा सोपस्कार यथोचित पार पाडून देखील त्याना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सातारा येथील कोटेश्वर मैदानावरती गेले 15 दिवस सुरु असलेल्या फन फेअर सुरु झालेच्या दुसऱ्यांच दिवशी 11 पत्रे चोरीला गेले असल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस स्टेशनला फन फेअरचे मॅनेजर प्रकाश गुप्ता यांनी केली होती. अद्याप त्याचे काय झाले असे असताना काल त्याचे अजून 2 पत्रे चोरीला गेले. विशेष म्हणजे हे पत्रे चोरताना त्यानी पाहिले संबंधितांचे फोटो देखील काढले.

प्रतापगंज पेठेतील नामदेव झोपडपट्टीतील कोणी तरी हे व या अगोदरचे देखील पत्रे चोरले असणार असा विश्वास गुप्तां यांचा आहे. आमचे पत्रे आम्हाला पुन्हा मिळणार का चोरांना पोलीस पकडणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणं आवश्‍यक बनले आहे. सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी घरफोड्या, चोऱ्या यांचे प्रमाण वाढले आहे, सातारा शहरामध्ये अवैध धंद्याबाबत पोलीस अधीक्षकांनी तीव्र स्वरूपात मोहीम सुरु केली, मोक्का सारख्या कारवाया करून सातारा पोलिस दलाची मान उंचावली आहे. मात्र इतरांचे काय असा प्रश्न उपस्थित होतो. कामात कसूर करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणाऱ्या अधीक्षकांच्या कामात कर्तव्यात कसुर करून त्याच्या नावलौकिकाला डाग लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये इतकीच सातारा वासीयांची माफक अपेक्षा आहे. आपल्या कार्य कक्षेत चोरी होते, त्या चोरांची माहिती देखील दिली जाते आता यावर कधी कारवाई होणार व आमचे पत्रे मिळणार का असा प्रश्न फन फेअर सारखे व्यावसायिक व कित्येक त्रस्त नागरिक विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)