सातारा : दोन डंपरसह सहा ब्रास वाळू जप्त

 उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने यांची कारवाई; चौघांविरोधात गुन्हा दाखल

रहिमतपूरहून जेजुरीला वाळू घेऊन निघालेल्या दोन डंपरवर पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी रात्री पाटखळ माथा परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने रात्रगस्त घालत होते. त्यावेळी पोलिस व महसुलच्या पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई केली. याप्रकरणी सहा ब्रास वाळू व दोन डंपरसह एक स्विफ्ट कार पोलिसांनी जप्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत मंडल अधिकारी प्रशांत कदम रा. सदरबझार,सातारा यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, दि. 22 रोजी सातारचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने हे रात्रगस्त घालत होते. त्यावेळी साताऱ्याहून पुण्याकडे जाणारे (एमएच 11 एएल 4716 ) व (एमएच 11 एएन 4816)े दोन डंपर वाळूची वाहतूक करत असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी त्यांनी वाळू उपसा परवान्याची मागणी संबंधीत डंपर चालकाकडे केली. त्यावेळी परवाना नसल्याचे चालकांनी सांगीतले. त्यामुळे राजमाने यांनी दोन डंपरसह त्याच्या चालकांना ताब्यात घेतले.

त्यावेळी पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर कार (क्र .एमएच 11 बीएच 6374) मधील दोघांनी डंपर आमचे असल्याचे सांगत रहिमतपूरहून जेजुरीला वाळू घेऊन निघाल्याचे सांगीतले. पोलिसांनी परवाना दाखवा असे म्हणताच तो नसल्याचे त्यांनी सांगीतले.

त्यामुळे पकडलेले डंपर हे अवैध वाळूची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्याने डंपर चालक मारूती शामराव मदने (वय 30 रा. भंडारमाची,रहिमतपूर), संजय बाबुराव पवार (वय 55 रा. गांधीनगर,रहिमतपूर) तसेच स्विफ्टमधुन आलेल्या दोघांच्या विरोधात वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चोरीचा गुन्हा सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिसांनी यावेळी सहा ब्रास वाळू,दोन डंपर,एक स्विफ्ट असा 17 लाख एकतीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला. दाखल गुन्ह्याचा तपास स.पो.नि. शाळीग्राम करत आहेत.

फोनाफोनीला पोलिसांनी दाद दिलीच नाही
शनिवारी रात्री गजानन राजमाने यांच्या पथकाने पाटखळ माथा येथे कारवाई केलेले डंपर पुणे जिल्ह्यातील एका बड्या नेत्याशी संबंधीत आहेत. त्यामुळे शनिवारी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख,गजानन राजमाने यांना वाळूचे डंपर सोडण्यासाठी सतत फोनाफोनी सुरू होती. मात्र पंकज देशमुख, गजानन राजमाने यांनी त्या फोनाफोनीला सासवडचा घाट दाखवत कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)