सातारा तालुक्‍यातील 8 गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 3 कोटी

सातारा – संपूर्ण महाराष्ट्रात रोल मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा-जावली विधानसभा मतदासंघाचा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे साताऱ्यासह जावली तालुक्‍यातील सर्वच गावे टंचाईमुक्‍त होत आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या कल्पक प्रयत्नांतून सातारा तालुक्‍यातील 8 गावांच्या पाणीपुरवठा योजानांसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून 2 कोटी 95 लाख 2 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

सातारा तालुक्‍यातील 8 गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी भरीव निधी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपलब्ध करुन दिला आहे. सातारा तालुक्‍यातील आसनगाव येथील जुन्या पाणीपुरवठा योजनेतून अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत असे. त्यामुळे या गावात नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी तब्बल 74 लाख 99 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. नरेवाडी (कोंदणी) येथील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 31 लाख 16 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कळंबे येथील नळपाणीपुरवठा योजनेसाठी 43 लाख 51 हजार रुपये, आंबळे (रायघर) येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 25 लाख 2 हजार, माळ्याचीवाडी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 16 लाख 52 हजार रुपये, राजापुरी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 29 लाख 27 हजार रुपये, धनगरवाडी (चिखली) येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 7 लाख 41 हजार आणि दरे बुद्रुक येथील पाणी पुरवठा योजनेसाठी 67 लाख 14 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

या सर्वच गावातील पाणीपुरवठा योजना या खूप जुन्या झाल्याने अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत असे. तसेच वाढत्या लोकसंख्येच्या मानाने नवीन पाणीपुरवठा योजना होणे अत्यावश्‍यक होते. या समस्या ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या आठ गावांच्या नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याने या गावातील पाणीप्रश्‍न कायमचा निकाली निघणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)