सातारा : जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अंकुश जाधव 

सातारा : सातारा जिल्हा बार असोसिएशनची चालु वर्षाची निवडणुक पार पडली असुन अंकुश जाधव यांची अध्यक्षपदी तर रफिक शेख यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बार असोसिएशनच्या निवडणुकीत विरोधात आलेले अर्ज जेष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चर्चेत मागे घेण्यात आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याची माहिती ऍड.वैभव काटकर यांनी दिली.

सचिव ऍड.रविंद्र क्षीरसागर, खजिनदार ऍड.चंद्रकांत रेडेकर, महिला प्रतिनिधी ऍड.वंदना सपकाळ, ऍड.स्नेहल कापसे, तर सदस्य म्हणुन ऍड.सागर माने, ऍड.प्रशांत खरे, ऍड.समाधान महामुलकर, ऍड. शंभुराज यादव, ऍड.रविंद्र डिगे, ऍड.ओंकार शेटे, ऍड.रूपेश खाडे, ऍड.ओंकार वाकणीस, ऍड. सुशांत घाडगे यांच्या निवडी बिनविरोध झाल्याची माहिती ऍड.बी.टी सानप यांनी दिली. नविन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच बार असोसिएशनच्या सर्व सभासदांनी शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)