सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याने केले विषप्राशन

सातारा : तारगाव, ता. कोरेगाव येथील शेतावर जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रस्ता द्यावा, या मागणीचा पाठपुरावा होत नाही. त्यामुळे नैराश्‍येपोटी सुनील संपत मोरे वय 37 यांनी जिल्ल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बुरशीनाशक औषधप्राशन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली. शासकीय कर्मचारी व तैनात पोलिसांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तारगाव शिवारात ग्रामस्थांची शेती आहे. त्याठिकाणी सुनील मोरे यांच्या नावावर एक एकर शेत आहे. त्या शेतात जाण्यासाठी बैलगाडी रस्ता तयार करून द्यावा, या मागणीचे निवेदन कोरेगाव तहसीलदार स्मिता पवार यांच्याकडे निवेदन दिले होते. परंतु, रस्त्याबाबत इतर शेतकऱ्यांची संमती, नकाशा, जाबजाबाब व आवश्‍यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. ही कागदपत्रे शासकीय कार्यालयातून लवकर प्राप्त होणार नाही.

आपल्याला सहजासहजी शेत रस्ता मिळणार नाही. यापेक्षा जिल्ह्या प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुनील मोरे यांनी दुपारी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सोबत घेऊन आलेली विषाची बाटली उघडी करून ती तोंडाला लावली. ही बाब समजल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेले शासकीय कर्मचारी व पोलिसांनी तातडीने मोरे याना क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

परंतु, कोणीही वरिष्ठ वैदकीय अधिकारी हजर नव्हते. त्यानंतर डॉ. खाडे व डॉ. मुंडे यांनी तातडीने उपलब्ध औषध उपचार केले. यावेळी कोरगावच्या तहसीलदार स्मिता पवार व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून तारगावचे ग्रामस्थ कांतीलाल पाटील, राजू मोरे, सुनील मोरे, विजय मोरे, अजित मोरे, प्रकाश घोरपडे यांनी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आलेल्या सुनील मोरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली असता त्यांना खाजगी दवाखान्यात किंवा पुणे येथे हलवावे लागेल, असे सांगण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांची दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)