सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आरडीसीं’कडूनच नियमांचे उल्लंघन

खासगी गाडी लावली आवारात


सर्वसामान्यांना मात्र बंदी

सातारा- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारती परिसरात खासगी वाहने लावण्यास बंदी केलेली असताना खुद्द निवासी उपजिल्हाधिकारी तथा आरडीसी सचिन बारावकर यांच्याकडूनच नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. सोमवारी बारावकर यांचे खासगी वाहन दिमाखात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. साहजिकच साहेबांची गाडी असल्यामुळे हटविण्याची सूचना देण्यासाठी एक ही कर्मचारी पुढे येण्यास धजावला नाही. तर दुसऱ्याबाजूला मात्र, सर्वसामान्य अथवा ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यप्रवेशव्दारापर्यंत वाहन नेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तात्काळ वाहन हटविण्यास सांगितले जाते.

एकूण प्रशासनाचे मुख्य कार्यालयात अशा प्रकारे कारभार चालत असेल तर ग्रामीण भागातील अण्णासाहेबांचा रूबाब कसा असेल, याबाबतचा विचार आता जनतेने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी करायला हवा. जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्वांच्या पदांपैकी निवासी उपजिल्हाधिकारी हे पद आहे. आस्थापनेतील बदल्यांसह अनेक परवाने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून दिले जातात. मात्र, त्या पलिकेडे जावून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणारी आंदोलने व आंदोलनकर्त्यांशी समन्वय ठेवून प्रश्‍न मार्गी लावण्याची जबाबादारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच 24 तास ऑन ड्युटी असेच निवासी उपजिल्हाधिकारी हे पद आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून या पदावर संवेदनशील अधिकाऱ्याची नियुक्ती होताना दिसून येत नाही. उलट यापुर्वी या पदावर असलेले संजीव देशमुख यांनी तर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची बदली होताच त्यांचा बंगला तात्काळ काबिज केला होता. यावरून देशमुखांचा थाट कसा असेल हे सांगालया नको. तर त्यानंतर आलेले भारत वाघमारे यांची कार्यपध्दतीमुळे मुदतपुर्वच स्वगृही व साईड ब्रॅंचला त्यांची बदली करण्यात आली.

त्यानंतर नुकतेच काही महिन्यांपुर्वी सचिन बारावकर यांची डिव्हीजन बदलून उस्मानाबादवरून साताऱ्याच्या निवासी उपजिल्हाधिकारपदी नियुक्ती करण्यात आली. सुरूवातीला सर्वसमान्य वाटत असलेले व्यक्तीमत्वाचा मात्र थाट सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिसून आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारापर्यंत वाहन घेवून जाणे इथपर्यंत ठीक होते. मात्र, एका बाजूला नो एंट्रीचा बोर्ड लावलेला असताना आवारात दिमाखात खासगी वाहन लावून त्यांच्या कार्यालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे. इतरवेळी अस्थापनेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनीच आता नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे राहणार आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी असावा असा
जिल्हाधिकारी कार्यालयात आजपर्यंत जसे रूबाबातले तसे अनेक संवेदनशील निवासी उपजिल्हाधिकारी ही जिल्ह्याने पाहिले आहेत. त्यामध्ये नाव सोनाप्पा यमगर यांचे नाव नमूद करावे लागेल. यमगर यांनी जिल्ह्यावर दुष्काचे संकट निर्माण झालेले असताना पाणी पुरवठ्यासाठी केलेली उपाययोजना तसेच तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.एन.रामास्वामी यांच्याशी समन्वय ठेवून चालविलेला प्रशासकीय कारभाराचे आज ही कर्मचारी व नागरिक कौतुक करतात. त्याच बरोबर ते गंभीर विषयावरील आंदोलनकर्त्याशी बाहेर येवून तर चर्चा करायचे त्यातून प्रश्‍न सुटला नाही तर रात्री त्या पुन्हा त्या ठीकाणी येवून आंदोलनकर्त्यांच्या प्रकृतीची आत्मयितेने चौकशी करत असायचे. मात्र, मागील काही वर्षापासून परिस्थती बदलली आहे ती आजपर्यंत कायम आहे.

ती वाहने कोणाची
जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थाने देण्यात आली आहेत. त्या निवासस्थांनाच्या बाहेर रात्री उशिरापर्यंत आलिशान वाहने लागल्याचे दिसून येते. ती वाहने नेमकी कोणाची व कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी कर्तव्य बजावण्यासाठी एवढी तत्परता का, याचे ही कोडे आता लवकरच उघडणे गरजचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)