सातारा: जिल्हयातील दीड हजार बूथवर भाजपचे लक्ष्य

सातारा – सातारा जिल्हयातील विधानसभेच्या महत्वाच्या जागाजिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील सुमारे दीड हजार बूथवर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीत बूथ बांधणीचे काम समाधानकारक नसून, नेत्यांचाच हात आखडता असल्याने कार्यकर्तेही फारसा उत्साह दाखवत नाहीत. त्यामुळेच वेळप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाने दम देऊन सर्वाना कामाला जुंपण्याकडे स्थानिक नेत्यांचा कल आहे.

राज्यात आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका होऊ शकतात, अशी शक्‍यता गृहीत धरून राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. जिल्हयात सातारा कराड वाई पालिकाजिंकल्यानंतर भाजपला शहरातील महत्वाचे विधानसभा मतदारसंघ जिंकायचे आहेत. कराड उत्तर माण पाटण व खंडाळ्यासह साताऱ्यात चमत्कार घडवण्याची अपेक्षा भाजपची नेतेमंडळी बाळगून आहेत .. कराड पाटण व माण विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत सातारा विधानसभा मतदारसंघात रसद अंर्तगत मतभेदामुळे कमी पडत असल्याने पक्षश्रेष्ठी नाराजीच्या सुरात आहेत . दीपक पवार यांच्या विश्वासार्हतेविषयी शंका असल्याने साताऱ्यात चमत्कार घडवू शकणाऱ्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे . यापुढे भाजपला स्वबळावर सत्ता आणायची असल्याने एकेक जागा महत्त्वाची आहे. सातारा जिल्हयात पालिका व जिल्हा परिषदेच्या बऱ्याच जागा जिंकल्याने उत्साह दुणावलेल्या भाजपला आता सातारा जिल्हयात आमदारकीच्या जागाजिंकण्याचे भाजपचे नियोजन आहे. पक्षीय पातळीवर कराडचा अपवाद वगळता सध्या प्रचंड गटबाजी आहे. मतभेद बाजूला ठेवून संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हयातील सरासरी 1500 बूथमध्ये जणांची कार्यकारिणी तयार झाल्याचे या वेळी करण्यात आली आहे . येत्या तीन महिन्यात बूथचे काम पूर्ण करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे आगामी26 मे रोजी सांगली महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्धा डझन कॅबिनेट सांगलीत तळ देणार आहेत . यावेळी पक्षीय बांधणीत बूथ लेव्हल तयारी चा सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुसतेच मिरवणारे नेते

शहर भारतीय जनता पक्षात तीव्र गटबाजीचे राजकारण असून स्थानिक नेत्यांचा शह-काटशह सुरू आहे. नेते म्हणून मिरवणारे संघटनात्मक कामात फारसे स्वारस्य दाखवत नाहीत. पक्षाच्या कामात हातभार लावत नाहीत, अशा वपर्यंत तक्रारी गेल्या आहेत. अलीकडेच दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यातील एका नेत्याला विनाकारण मंत्रालयात तुंबडया लावायला येउ नका असा राजकीय दम देण्यात आला आहे . आत्मपरीक्षण करायचे सोडून नेत्यांनी जनता जनार्दनाची साक्ष काढत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणार अशी हमी दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)