सातारा : घरासमोर लावलेली बुलेट अज्ञाताने पेटविली 

संग्रहित छायाचित्र

कोडोली – सातारा शहरा लगतच्या संभाजीनगर मधील बारावकर नगर मध्ये बुधवार पहाटे तीनच्या सुमारास हृषीकेश लक्ष्मण सूर्यवंशी यांची घरा समोर लावलेली नवीन बुलेट गाडीस अज्ञाताने पेटवून दिल्याने संभाजीनगरमध्ये भितीचे वातावरण पसरले असून पुणे-मुंबई मधील गाड्या पेटवण्याचे लोण येथे येते की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.

या बाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी रात्री सुर्यवंशी यानी आपली बूलेट गाडी क्रमांक एम एच ११सी ई४६६४ घरा समोर लावली होती. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घराच्या खिडकीतुन गाडी जळत असल्याचा धूराचा वास मोठ्या प्रमाणात आल्याने त्यानी दार उघडले असता आपल्या बुलेटला आग लागल्याचे दिसता क्षणी त्यानी आरडा आेरडा केला.  जमा झालेल्या लोकांनी घरातल्या पाण्याने आग विझवली. आगी मध्ये गाडी चे ७५ % नुकसान झाले आसून सदर घटनेची नोंद एम आय डी सी पोलीस स्टेशनला झाल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)