मायणी : खटाव तालुक्यातील मायणी या गावातील भिकवडी रोड, माळी नगर रोड, जमादार मळा, वलखड रोड या परिसरामध्ये रविवारी रात्री खून झाला असल्याची माहिती लोकांना मिळत होती. त्यामुळे अनेकांनी त्या – त्या वस्तीवर संपर्क साधला असता आमच्या वस्तीवर नाही दुसऱ्या वस्तीवर, दुसऱ्या वस्तीवर विचारल्यास तिसऱ्या वस्तीवर, तिसऱ्या वस्तीवर विचारल्यास चाैथ्या वस्तीवर खुन झाला असल्याचे सांगितले जात होते.
पण अशी सुरू असलेली चर्चा हळूहळू संपूर्ण गावात पसरली त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण व दबक्या आवाजात खुनाविषयी चर्चा सुरू होती. प्रत्येकजण आपापल्या परीने माहिती घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र मायणीचे स.पो.नि संतोष गोसावी यांनी सदरची खुनाची अफवा असुन लोकांनी घाबरु नये असे सांगितले आहे. मात्र या अफवेने शहरातील नागरिक दहशतीखाली असल्याचे दिसुन येत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा