सातारा : खातवळच्या सटवाईचा रथोत्सव उत्साहात

कातरखटाव- ‘आई सटवाईच्या नावाने ….चांगभलं ……” चा जयघोष व गुलालाची उधळण करत खातवळ येथील ग्रामदैवत सटवाई देवीचा रथोत्सव उत्साहात पार पडला. दुपारी श्री च्या मूर्तीचे वाजत-गाजत मंदिरात आगमन झाल्यावर श्री ची आरती करणेत आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आकर्षक सजवलेल्या रथाचे पुजन करुन रथोत्सवास सुरवात झाली.रथापुढे ढोल पथक व सूर -सनई वाजंत्री मंडळ असा लवाजमा होता.

रथ मिरवणूकीमध्ये लहान -थोर मंडळीसह वयोवृद्ध ग्रामस्थ व हजारो भाविक सहभगी झाले होते.सटवाई मंदिरापासून सुरु झालेली रथाची मिरवणूक हनुमान चौक,विठ्ठल चौक,चांदणी चौक,बस स्थानक,ज्योतिर्लींग नगर मार्गे जात एनकूळ रस्त्याने येवून ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करत रात्री उशिरा मंदिराजवळ पोहचली. रथ मिरवणूकी दरम्यान भाविकांनी रथाचे दर्शन घेत पन्नास रूपयापासून दहा हजार रूपये पर्यंतच्या रक्कमेच्या माळांची तोरणे, नारळाची तोरणे रथावर अर्पण केली. रथावर भाविकांनी दोन लाख नऊ हजार तिनशे रूपये अर्पण केले.

रथोत्सव मिरवणूकीसाठी तालुक्‍यातील विविध क्षेत्रातील मान्यवरासह भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.रथ सोहळयानिमित्त घरोघरी गुढया उभ्या करून घरासमोर काढलेली आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. रथोत्सवानिमित्त मंदीरावर.शिखरावर व मंदीर परिसरात आकर्षक सजावट व रोशणाई करण्यात आली होती.यात्रेनिमित्त सटवाई मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, मेवा-मिठाई, स्टेशनरी, कटलरी आदी दुकाने थाटली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)