सातारा : खाजगी सावकारांना मोका लावा – रघुनाथराजे 

 फलटण : कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण ने सुरु केलेल्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी व्यथा निवारण केंद्रात विविध तक्रारी दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांचा ओघ वाढलेला असून शेतकरी हमाल खरेदीदार यांनी खाजगी सावकारी करणाऱ्या उमेश पवार व आप्पा करचे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करताच त्यांना मोक्का लावण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली आहे.

फलटण तालुक्‍यात धोमबलकवङीचे पाणी आल्यामुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमालाची आवक वाढलेली आहे.मार्केट यार्ङवर शेतकऱ्यांसह खरेदीदार हमाल यांच्या सह महिलांची संख्या वाढली आहे.फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबासाठी अनेक हितकारी विविध योजना सुरू केल्या आहेत.  नियमित आवक आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अल्प दरात रक्कम रुपये 12 मध्ये “मालोजी शिदोरी”च्या माध्यमातून जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यार्ङवर भर दिवसा धिंगाणा घालणे धमक्‍या देणे जीवास धोका उत्पन्न करणे असे प्रकार सर्रास सुरू असून या प्रकरणात काहीजण आत्महत्या करण्याचा प्रसंग उदभवणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावर उमेश पवार रा. सोमवार पेठ फलटण व निलेश उर्फ आप्पा करचे रा. सोमंथळी ता. फलटण यांच्या कृत्यास अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ञास वाढतच चालल्याने सदर सावकारांवर व गावगुंङांवर मोक्का लावण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री, जिल्हा पोलीस प्रमुख, गृहमंत्री आदीना निवेदने देण्यात आली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)