सातारा : कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांचे निलंबन

वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांचे पालन न केल्याप्रकरणी बरड पोलिस दुरक्षेत्राचे एक बीट अमंलदार, तर वरिष्ठांशी उध्दट वर्तन केल्याप्रकरणी फलटण ग्रामीणची महिला हवालदार व सातारा मुख्यालयातील वारंवार गैरहजर राहणारे पोलिस नाईक अशा 3 पोलिस कर्मचार्‍यांना जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी निलंबीत करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

फलटण शहर पोलिस ठाण्याच्या बरड चौकीचे नानासो काका कांबळे यांना त्यांच्या बीटात सुरू असलेले अवैध धंद्यांची माहिती काढत त्यावर छाप कारवाई करण्याच्या सुचना परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक पवन बनसोड यांनी मार्च 2018 मध्ये दिल्या होत्या. मात्र कांबळे यांनी कारवाई न करताच वरिष्ठांची दिशाभुल केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक पवन बनसोड यांनी सरडे या गावात छापा टाकत सुरू असलेली हातभट्टी उध्वस्त करत गुन्हे दाखल केल्याने काबंळे यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नसल्याने त्यांना जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी निलंबीत करून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

फलटण ग्रामीणच्या महिला पोलिस हवालदार अनिता बाबासाहेब पानसरे यांना तक्रारदारांशी उध्दटपणे बोलणे, तक्रार घेण्यास टाळाटाळ करणे, तक्रारदार यांना पैशाची मागणी करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे,पोलिस ठाण्यात गोंधळ घालणे असा ठपका ठेवत त्यांना जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी निलंबीत केले आहे

.सातारा पोलिस मुख्यालयातील पो.ना. मधुकर पांडुरंग धुमाळ हे वारंवार कर्तव्यावर गैरहजर राहत असल्याने त्यांनाही जिल्हा पोलिस प्रमुखंनी सेवेतून निलंबीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)