सातारा :  कंत्राटी अभियंत्याची सेवा खंडित

सातारा- सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाची गेल्या वीस वर्षापासून कमान सांभाळणारे कंत्राटी अभियंते सुधीर चव्हाण यांना चार महिन्यासाठी सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी अधिकृत खुलासा केला नसला तरी सातारा विकास आघाडीचे प्रमुख दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनी सूचना केल्याने पालिका वर्तुळात मंगळवारी एकच खळबळ उडाली.

जल मंदिर येथे उदयनराजे यांनी विकास कामांच्या संदर्भात पालिकेत त्या विभागप्रमुखांची अचानक बैठक घेतली. पालिकेच्या दैनंदिन कामकाजात जी ढिलाई जाणवत आहे त्याबद्दत त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्‍या दिल्या. सर्वांनी एकदिलाने काम करा नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा. कामात हयगय करू नका अशा स्पष्ट सूचना उदयनराजे यांनी दिल्या.

कमराबंद बैठकीला उदयनराजे यांनी सर्व विभागप्रमुख मुख्याधिकारी नगराध्यक्ष कोअर कमिटीच्या सदस्यांना दुपारी चार वाजता जलमंदिर येथे तातडीने पाचारण केल्याने नगर पालिकेत दुपारनंतर सामसूम होती. प्रसारमाध्यमांनाही याची कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती. सातारा शहरात गेल्या आठवडाभरात विकास कामांचे अनेक नारळ फुटले. या विकास कामांमध्ये पालिकेच्या लोकवर्गणीचा ताळेबंद मांडताना अवघी पावणेआठ कोटीची वसुली समोर आल्यानंतर उदयनराजे यांनी परखड शब्दात वसुली विभाग प्रमुख अरविंद दामले यांना कानपिचक्‍या दिल्याची चर्चा आहे.

कंत्राटी अभियंता सुधीर चव्हाण यांच्या कार्यशैली बद्दलही बैठकीत बऱ्याच तक्रारी झाल्या. पाणी वितरणचे अनियमन व महिला नगरसेविंकांच्या वाढत्या तक्रारी थेट उदयनराजे यांच्यापर्यंत पोहोचल्याने उदयनराजे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना चार महिन्यासाठी निलंबित करण्याची सूचना केली. उदयनराजेंच्या रुद्र अवतारामुळे कर्मचारी चांगलेच हडबडले. थेट खासदारांकडून चव्हाण यांच्या निलंबनाची सूचना झाल्याने बांधकाम विभागाने तर हायचं खाल्ली आहे.

सुधीर चव्हाण गेल्या बावीस वर्षापासून कंत्राटी तत्वावर पालिकेच्या बांधकाम विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहेत. कंत्राटी असूनही पाणी पुरवठा विभागाचा एकहाती सांभाळत होते. मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या कार्यशैलीबाबत अनेक तक्रारी वाढल्याची कुणकूण होती. विशेषतः शहराच्या पश्‍चिम भागातील पाणी वितरणाच्या मनमानी पध्दतीमुळे काही वादाचे प्रसंग उद्भवले. ते वाद चव्हाण यांना भोवल्याचे बोलले जात आहेत. वसुली स्थावर जिंदगी तसेच अनेक विभागांचा सखोल आढावा उदयनराजे यांनी घेतला. कर्मचाऱ्यांची पाठ थोपटताना थेट कारवाई करण्याचा इशारा उदयनराजे यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)